दानवे रुपी दगडाला आता पुन्हा शेंदूर लावू नका

वेगवान मराठी / विजय चौधरी
सोयगाव, ता. 3 में 2024 – 25 वर्षात एकदाही रावसाहेब दानवे यांना सोयगाव तालुक्यात दिसला नाही. आता पडण्याची भीती असतांना त्यांना सोयगाव तालुक्यातील जनता आठवली का, आता कल्याण काळे हा तुमच्या मनासारखा माणूस निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. असे काँग्रेस नेते माजी आमदार नामदेवराव पवार यांनी जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार इंडिया/महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या सोयगाव येथील प्रचार दौरा सभेत मतदारांना आवाहन केले आहे.
ब्रेकिंग अजिंठा घाटात पुणे-रावेर बसचा भीषण अपघात
डॉ.कल्याण काळे यांच्या सोयगाव येथील प्रचार सभेला नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला असून रावसाहेब दानवे यांच्या विषयीची नाराजी सोयगाव तालुक्याच्या जनतेमधून दिसून येत आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले की,भाजपा ही जुमला पार्टी असून त्यांना घरचा रस्ता दाखवा.
रेशनचे धान्य मिळत नाही ८० कोटी जनतेच्या गप्पा सांगू नकाः दानवेंना भर सभेत जाब
तसेच दानवे रुपी दगडाला आता पुन्हा शेंदूर लावू नका ,आता विकासाला मत द्या ,असेही राजेंद्र राठोड यांनी बोलताना सांगितले अनेक सोंग अंगात आणणारा रावसाहेब दानवे हा बहुरूपीया असून हिंदू मुस्लिम समाजात विष पसविणारा पक्ष म्हणजे भाजपा असे मत जेष्ठ नेते जयसिंगराव पवार यांनी सभेला जमलेल्या जनतेसमोर व्यक्त केले ,
रावसाहेब दानवे यांचा डीएनए टेस्ट करणे गरजेचं दानवे पाकिस्तानचे की चीन चे हेच समजणे अवघड असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे उत्तर शेतकऱ्यांनी भाजपाला दयावे असे आवाहन देखील त्यांनी सोयगाव शहरात सभेला उपस्थित जनतेला केले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोयगाव शहर प्रमुख रवींद्र काळे,काँग्रेस सोयगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख दिलीप मचे, गुलाबराव कोलते,भैय्या जूनघरे पाटील, भरत पगारे,रवींद्र काटोले यांच्यासह इतर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
