राजकारण
बीड मध्ये हा समाज एकवटल्याने, कुणाचा होणार विजय, पंकजा की बजरंग बप्पा?
बीड मध्ये हा समाज एकवटल्याने, कुणाचा होणार विजय, पंकजा की बजरंग बप्पा?

वेगवान मराठी / अरुण थोरे
बीड, ता. 17 में 2024 – बीड मधील निवडणूक अत्यंत अटीतटीच्या लढतीत झाली. महाविकास आघाडीसह महायुतीच्या मातब्बर नेत्यांच्या सभा गाजल्या मात्र बीडची निवडणूक गाजली ती इथल्या समाजामुळे इथं समाजाच्या गोष्टी काही नविन नाही. मात्र ह्यावेळी त्याची तीव्रता जास्त होती. ती जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे.
मुख्यमंत्री नाशिक मध्ये येताच पोलीसांकडून त्यांची तपासणी सुरु
मराठा आरक्षणाची धग बीड मधील सर्वच मातब्बर नेते मंडळींना बसली होती, सुरवातीच्या काळात पंकजा मुंडे या बॅक फुटीवर गेल्या होत्या, मात्र जिल्ह्यातील सर्वच मराठा नेते पंकजांच्या सोबत होते. मतदारसंघातील झालेला जातीवादाने बीड मध्ये ओबीसी व मराठा समाज समोरासमोर आल्याचे दिसले. यामुळे ओबीसींच्या सर्वच जाती पंकजासाठी सरसावल्याच दिसुन आले असुन, स्थानिक पत्रकारांच्या मते ओबीसींच्या इतर जातींतील विभाजनारे मते ही पंकजांना झाल्याचं बोललं जातं आहे.
ह्या वेळी मतदानाची वाढलेली टक्के वारी ही विलक्षण असुन, फक्त जत्रेसाठी गावी येणारी पुणे- मुंबईतील मतदार या वेळी खास मतदानासाठी गावी आले आहेत.
यासाठी मुंबईतील विविध भागात प्रितम मुंडेंनी भेटीगाठी व चौक सभा घेतल्या होत्या. मतदानाआधी झालेल्या प्रचारसभेने ही काहीशी परिस्थिती बदलल्याचे बोललं जात आहे. मराठा समाजाचा विशेषतः देवेन्द्र फडणवीसांवर राग असुन, फडणवीस – मुंढेतील सुप्त वादांमुळे फडणवीस सभेसाठी आले नाहीत, मात्र अजित पवार व उदयनराजेंनी पंकजांची सभा गाजवली,
उदयनराजेंनी तर माझ्या बहिणीला निवडुन द्या, नाही तर मी राजीनामा देऊन तीला सातारा मधुन निवडुन आणतो असे भावनिक आवाहन मराठा समाजाला केल्याने. बजरंग बप्पाचा २०% मराठा मतदार तुटल्याचे बोलले जात आहे. त्यातच सुजय विखेंच्या प्रचारात मी एका मराठा उमेदवाराच्या प्रचाराला आल्याचं सांगत वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला.
मागील निवडणुकीत धनंजय मुंडे हे पंकजा सोबत नसल्याने ओबीसी मतदानात मोठी फुट झाली होती. यावेळी मात्र त्याचा फायदा पंकजांना होईल असे बोलले जात आहे. मात्र दलीत मुस्लिम मतदारांनी बजरंग सोनवणेंना कल दिल्याने बीडमधील बाजी बदलु शकते. मात्र मुस्लिम समाज मतदानासाठी पुरेशा प्रमाणात बाहेर न पडल्याने ती टक्केवारी वाढली असती तर सोनवणेंचा विजय सोपा झाला असता. हे सगळं असलं तरी मराठा मतदार न फुटल्यास बीड मध्ये बजरंग सोनवणे बाजी मारतात की पंकजा मुंडे हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.मात्र बीड मध्ये झालेला जातीवाद कुणाच्या पथ्यावर पडला हे निकालानंतर च् स्पष्ट होईल.
शेवटी बघायला गेलं तर हे अंदाज आहे. अंदाज काही बांधले जातात. मात्र लोक दाखवितात वेगळं अनं करतात वेगळं हे राजकारणात दिसून आले आहे. त्यामुळे सध्या तरी निकाली वाट पाहवी लागणार आहे. यात शंका नाही.
