किर्गिस्थानात हिंसाचार, महाराष्ट्रातील ५०० च्यावर विद्यार्थ
किर्गीस्थानात हिंसाचार, महाराष्ट्रातील ५०० च्यावर विद्यार्थ

वेगवान मराठी / अरूण थोरे
- नवी दिल्ली, नाशिक, २१ में २०२४ -(आँनलाईन टीम ) किर्गीस्थानात हिंसाचार उफाळला असून तेथील स्थानिक विद्यार्थी व इजिप्तशियन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे इतर देशातील विद्यार्थ्यांनाही टार्गेट केला जात आहे.
त्यामुळे तेथे बाहेरील देशातील विद्यार्थ्यांना मारहाण केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या हिंसाचारात पाकिस्तानचे पाच विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची माहिती समोर येत आहे. सध्या देशातील 14 हजाराच्या वर विद्यार्थी किर्गीस्थानात वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यापैकी महाराष्ट्रातील पाचशे विद्यार्थी किरकस्थानात शिक्षण घेत आहे. यात बिड, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे.यात स्थानिक विद्यार्थी व इजिप्शियन विद्यार्थी यांच्यात वाद झाल्याने हिंसाचार झाला होता.
त्यातूनच इतर देशातील विद्यार्थ्यांनाही टार्गेट करण्यात आले. त्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांनाही रूममध्ये घुसून मारहाण झाल्याच्या घटना समोर येत आहे. प्राथमिक दर्शनी भारतीय विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगितले जात असताना, तेथील स्थानिक प्रशासनाने होणाऱ्या परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित हस्तक्षेप करून भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणावे अशी मागणी पालकांकडून होत आहे.
