बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video

वेगवान नाशिक / अविनाश पारखे
नाशिक, ता. 22 में 2024- रात्रंदिवस काबाडकष्ट करून लोक पैसे जमा करतात आणि हे पैसे थोडे जास्त मिळतील व सुरक्षित राहतील या उद्देश पोटी आपण ते बँकेत ठेवतो. मात्र कुंपणाने जर शेत खाली तर रक्षण कोण करणार ? असाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातल्या बँक ग्राहकांना आलेला आहे.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव
त्यांनी बँक मध्ये एफडी केली मात्र त्यांची एफडी रिकामी झाली. यामुळे नाशिक जिल्ह्यात एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मोठा गोंधळ पाहण्यास मिळालेला आहे.
एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला. बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ईव्हीएम मशीन जवळ रात्री कोण काय करत होते ? ईव्हीएम सुरक्षा बाबत प्रश्नचिन्ह
युनियन बँक ऑफ इंडिया,मनमाड शाखेत मुदत ठेव ठेवलेल्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर येत आहे. शहरातील युनियन बँक शाखेमध्ये ग्राहकांनी विमा योजनांच्या माध्यमातून मुदत ठेव ठेवली होती. ही मुदत ठेव परस्पर काढून घेतल्याने युनियन बँकेचे शाखेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; या तारखेला लागणार निकाल
नेमका काय आहे प्रकार?
नाशिक जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्यास समोर आले आहे. या बँकेतील कर्मचारी आणि एजंट मिळून अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत काही तक्रारी समोर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये गोंधळ घातला.
वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
प्रत्येक जण आपल्या एफडी खऱ्या आहे की नाही याचा तपास करत आहे. बँक प्रशासनाला याबाबत विचारले असता प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार केल्याचं स्पष्ट केलं आहे.
Monsoon Update मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
मे युनियन बँक ऑफ इंडिया,मनमाड शाखेत मुदत ठेव ठेवलेल्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर येत आहे. शहरातील युनियन बँक शाखेमध्ये ग्राहकांनी विमा योजनांच्या माध्यमातून मुदत ठेव ठेवली होती. ही मुदत ठेव परस्पर काढून घेतल्याने युनियन बँकेचे शाखेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
यासंदर्भात बँक मॅनेजर अशोक सरोज यांनी मनमाड पोलीस स्थानकात संदीप देशमुख,राहणार चाळीसगाव या एजंट विरोधात भादंवि कलम 420,406,465,471 अन्वये अपहार प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अंदाजे एक कोटी 39 लाखाची फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. अधिक तपास मनमाड शहर पोलीस यांनी सुरू केला आहे.
