ईव्हीएम मशीन जवळ रात्री कोण काय करत होते ? ईव्हीएम सुरक्षा बाबत प्रश्नचिन्ह

वेगवान मराठी / अरुण थोरे
नाशिक, ता. 22 मे 2024 ( आॅनलाईन डेक्स ) – नगर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ईव्हीएम सुरक्षा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले असून रात्री दिनांक 21 मे रोजी ८ ते ८:३० च्या दरम्यान घडलेला घटनेचा घटनाक्रम माध्यमांना सांगितला.
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; या तारखेला लागणार निकाल
ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या ठिकाणी पोलीस यंत्रणासह सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे.
यासोबतच उमेदवारांचे काही प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पहारा करण्यासाठी उपस्थित असून, सर्व ईव्हीएम मशीन सीसीटीव्ही च्या देखरेखी खाली असताना रात्री ८ ते ८:३० च्या दरम्यान कुणी अज्ञात व्यक्ती गेटच्या आत येऊन मशीन असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या डिव्हाईसजवळ मोबाईलवर काही करत असल्याचा निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना आढळून आले,
वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
सदर व्यक्तीची चौकशी केली असता त्याने जिल्हाधीकार्यानी पाठवल्याचे सांगीतले याबाबत लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जिल्हाधिकाऱ्यांनी आत जाण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले. याबाबत मला कल्पना नसल्याचे जिल्हाधिकार्यानी सांगीतले व कुणी सीसीटीव्हीवाले असतील अशी शंका उपस्थित केली.
मान्सूची हजेरी… मान्सून येत आहे! पण कोणत्या मार्गाने, घ्या जाणून
या प्रकरणाबाबत लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले. व आत येण्यासाठी सीसीटीव्ही कर्मचारी असले तरी परवानगी शिवाय पाठवु नये. असे म्हटलं आहे.








