पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव,पोलीस,महानगरपालीका ,आरटीओ हे सर्व कारणीभुत

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 22 में 2024 Pune Kalyaninagar accident case पुणे अल्पवयीन मुलाने राजेरोस पणे दारू पिऊन कारने दोन व्यक्तिला मारले याचे राजकारण आणि पोलीसगिरी सुरू असल्याचे समोर येत आहे. अल्पवयीन मुलाचे पालक अग्रवाल याला अटक करून आज कोर्टात हजर करण्यात आले असले तरी हा अग्रवाल सोमवारी औरंगाबाद ( छ.संभाजीनगर) येथे पळून गेला होता. याला काल अटक करण्यात आली असली तरी अल्पवयीन मुलगा पोलीस ठाणे येरवाडा येथे अटक असतांना फार मोठे काहीतरी या पोलीस ठाण्यात घडले. Pune Kalyaninagar accident case from politics to police in essence
यात बिल्डर अग्रवालचा एक आमदार मित्र ठाण्यात येतो आणि येथून वेगळे चक्र सुरू होत असल्याची अनेकांची ओरड होत आहे• जिवाने दोन जिव गेले• या मुलास ,पालकास वाचविण्या करिता तन मन धनचा अबलंब होतो हे कोठ पर्यंत योग्य आहे. मरणारे तर या घटणेत बळी गेले त्यांच्या आई वडीलावर काय प्रसंग येत असेल याचा कोणी विचार राजकारणी, अल्पवयीन मुलाचे पालक आणि पोलीसविभागाने गांर्भियाने घेतले नाही•
सरकार कडून या घटने बाबत गंभीर स्वरूपातची दखल घेतली असली तरी या पुर्वी याबात योग्य रित्या पुणे मनपा,पोलीस,वाहतूक पोलीस,स्थानिक राजकारणी आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी नियोजन वेळोवेळी केले असते तर या प्रकारची घटणा घडल्या नसत्या•
आज याबाबत राजकारण आणि पोलीस विभागाकडून वाचवाचवी सुरू असल्याचे दिसत आहे• पुणे कल्याणीनगर येथिल घटना ही एक उच्चभू बिल्डरच्या मुला कडून घडलेली घटना•
हिच घटना सर्व सामान्य कुटूंबिया कडून घडली असती तर ईतका मोठ्या प्रकारे राजकारणी,पोलीस,प्रसारमाध्यमाने याची दखल घेतली नासती या गरीब अपघात करणारे याला शेवटी जेल मध्येच सडावे लागले असते •श्रीमंत बिल्डरचा मुलगा आणि तो अंल्पवयीन मग याच्या करिता आमदार रात्री ठाण्या मध्ये हजर होतो.
पोलीस विभाग या अटक केलेल्या मुलाची बर्गर ,पिस्ता सारखे पदार्थ पुरवून कोणी खातीरदारी केली आणि का केली धनिक पुत्र आहे म्हणून तसेच ही सेवा देतांना काही तरी मेवा मिळालाच असेलच ? शहरातील अनाधिकृत रूफटॉप हॉटेल किंवा टेरेस हॉटेल ,पक्का स्वरूपाचे पत्राशेड या बाबत अनेक वेळेस उपनगरातून स्थानिकांच्या तक्रारी महानगर पालिकेला वेळोवेळी आलेल्या असतांनाही यावर काना डोळा करण्याचा प्रकार केला गेला •
पबला उत्पादन शुल्क विभागाकडून परमीट रूमची परवानगी दिली जाते यात पोलीस विभागाकडून गाणे वाजविण्या साठी परवानगी दिली जाते तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करमणूक शाखा डिस्को लाईट परवानगी दिली जाते यांचा एक मेळ म्हणून पब मालक पब चालवितात ही सर्व कारवाई केल्या नंतरही कोणत्या ठिकाणी पब सूरू आहे याची नोंद कोणत्याही कार्यालयात नसते हेच यांच्या बाबत तक्रार आल्यास किंवा काही फार मोठी घटना घडल्यास हे कार्यालय एकमेका कडे बोटे दाखवून आपली बाजू सेफ करतांना आणि या नंतर खिसे भरतांना दिसतात•
सुरवातिला हॉटेल,बारची परवानगी घेऊन प्रत्यक्षात पब येथे सुरू असतो या पब मध्ये मुली वेटर,सर्व करणारे आणि वेळ आल्यास ग्राहका सोबत दारूपित त्याला साथ देण्याचा प्रकार • पबचा क्राऊड उच्चभु असतो या पब मध्ये एफएल 3 थ्री परवान्यानुसार सर्व्ह पुरवली जाते या पब मध्ये सिलबंद पॅकमध्ये दारू विकली जात नाही तर स्मॉल पॅकपासुन पुढील पॅक मध्ये विकली जाते •
याचे दर इथे सर्व काही तिप्पट दराने विकण्यात येतात• यांना परमीट रूमचा परवाना देणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग तर यांच्या पबला याचे कर्मचारी, अधिकारी भेट देत नसतील काय ? या उत्पादन शुल्क विभागाची फार मोठी साखळी आहे हे भेटी देतच नाही यांचा मलिदा घरा पर्यंत पोहोच होतो या कारणाने पब मालक फार ढेपाळले आहेत याच्यावर कारवाई केली तर स्थानिक पुढारी येऊन प्रकरण मिटवण्याचा प्रकार करतात•
ही एक पुण्या सारख्या शिक्षणप्रधान,ऊच्चभू असलेल्या शहराची गाथा आहे• माज चढलेले आणि पैशाच्या जोरावर उच्चभूआणि बापाने शिक्षणासाठी सोडलेले पैशाचा माज असलेले पबच्या दारात उभे राहतात • असले माज असलेले कोणत्या गरीब घराण्याच्या मूलीस वेगळ्या मार्गाला लावतील ही एक पुण्याची संस्कृती ऊदयास येत आहे•
कोणत्याही विभागाला पुण्या मध्ये पब,हूक्काबार कोठे कोठे चालतो याची नोंदतर सोडा साधी कल्पनाही नसेल ही बाब योग्य वाटते काय? ही घटना घडल्यानंतर नऊ हॉटेलवर कारवाई करण्यात आली यापुर्वी याची दखल का घेण्यात आली नाही • या निमीत्ताने एकच प्रकरण पुढे येते महानगरपालीका,पोलीस विभाग, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क , वाहतूक पोलीस , आरटीओ हे परवानगी तर संबंधीत हॉटेल,पब,बार यांना देतात जर अशी घटना घडल्यास एकमेका कडे बोटे का दाखवल्या जातात हा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे•
परवानगी देतांना जवळच्या रहिवाशी किंवा सोसायटीची, जागा भाडे तत्वावर देणारे यांची परवानगी(ऐनओसी)लागते तसेच एमएसईबी ,मनपा नळ जोडणी,फायर ब्रिगेड यांच्या कडील आलेले कागद, किंवा स्वताःच्या मालकिची जागा याची नोंदी तर कोठे ना कोठे असतात• हा सर्व विभाग कार्यालयात बसून सर्व ओके म्हणून नोंदी करत असल्याचे दिसतात प्रत्यक्षात कोठे बार,पब;हॉटेल सूरू आहे हे यांना माहित नसते या लोकांना घर पोहोच मलिदा मिळत असल्या कारणाने आज पुण्याची संस्कृती बिघडत चाललेली आहे •आज ही घटना घडली चार दिवस गाजावाजा होणार आणि येरे माझ्या मागल्या सारखी स्थिती चालू राहल्यास पुढे कधी आणि कोणत्या प्रकारच्या फार मोठ्या प्रसंगास पुणे करांना सामोरे जावे लागणार हा पुढील काळच सांगेल•
