
वेगवान मराठी
मुंबई, ता. 24- ,Remal Cyclone महाराष्ट्रात अवकाळी पावसाला पोषक वातावरण असून पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील या हंगामातील हे मोठं पहिले चक्रीवादळ असून रविवारी संध्याकाळपर्यंत बांग्लादेश आणि लगतच्या बंगालच्या किनारपट्टीपर पाेहचेल.
शेतक-यांना मिळणारी पीएम किसान पेन्शन बंद होणार ?
केरळ किनाऱ्याजवळील आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. या भागात ढगाळ आकाश दिसून येत आहे. अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ हासळीकर यांनी दिली आहे.
जगात सर्वात जास्त पगार कोणाला! आणि आहे तर किती ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून मोठे चक्रीवादळ तयार होत असल्याचे सांगण्यात आले.
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा वेग ७० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. पश्चम बंगाल व उत्तर ओडीशा या राज्यांच्या किनारपट्टीवर २६ आणि २७ मेदरम्यान हे चक्रीवादळ दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video
बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ तयार होत असून त्याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीवर धडकले तर त्याचा मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. ते म्यानमारच्या दिशेने वळले तर कदाचित मान्सूनला आणखी विलंब होऊ शकतो.
वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
दोन ते तीन दिवसांपासून कोकणात अवकाळी पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
नाशिक, धुळे, आहिल्यानगर,सातारा,पुणे,जळगाव,अकोला,अमरावती,वाशीम, यवतमाळ,चंद्रपूर,नागपूर,गडचिरोली,नंदुरबार, वर्धा,भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यामध्ये आज यलो अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.
