पुणे विद्यापीठ परिसरात सापडला गांजा

वेगवान मराठी / अरुण थोरे
पुणे, ता. 28 में 2024- राज्यात सध्या पुणे शहर अनेक घटनांनी हिटलिस्टवर असताना पुणे विद्यापीठाच्या परिसरात गांजा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे विद्यापीठातील एका वस्तीगृहात १८ मे रोजी गांजा सापडल्याने खळबळ माजली मात्र याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट ही आहे की गेल्या दहा दिवसात विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी धंगेकर व सुषमा अंधारे यांनी विद्यापीठाच्या कार्यालयावर धडक देऊन विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला.
याआधीही पुण्याचे ड्रग्स कनेक्शन अनेक वेळा उघडकीस आले असताना विद्यापीठातील वस्तीगृहात गांजा सापडणं ही मात्र गंभीर बाब आहे.
पुणे विद्यापीठ प्रशासनाने सदर गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी केला आहे काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्से कार प्रकरण तापलेले असताना, गांजा प्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झालेला दिसला.
