पुणे

पुणेः बालेवाडी, बाणेर मध्ये वाहतूकीचा बोजवारा

वेगवान मराठी / रमेस जयस्वाल

पुणे, ता. 28 में 2024 –  पुणे येथिल वाहतूक विभागाचा विचित्र कारभार सुरू आहे अनेक ठिकाणी वाहने जोतो उठतो रोडवरच पार्कींग करत सुटतो • असल्या प्रकाराला वाहतूक विभागच कारणी भूत आहे• मग ते जड वाहने असो की टू व्हिलर,फोर व्हिलर याच्यावर नियमानुसार कारवाई होत नसल्या कारणाने बालेवाडी,बाणेर विभागात वाहतूकीचा विचित्र कारभार सुरू आहे•

पदपथावर,रोडवर जागोजागी वाहने पार्कींग केल्या जात आहे• बाणेर पॅन कार्ड क्लब रोड वरिल कल्पतरू सोसायटी समोरील एका मोठ्या कंपनीच्या कार्यालया जवळील पदपथावरच दोनशे ते तीनशे मोटरसायकल आणि दहा ते पंधरा कार पार्किंग बेदिक्कत पणे केल्या जात असल्या कारणाने पदपथावर चालनेच कठीन होत आहे•

तसेच बाणेर येथिल अनेक वाईन शॉप समोर सायंकाळ पासून दारू विकत घेणारे ग्राहक रोडवरच वाहने पार्क करतात याची सर्व कल्पना वाहतूक पोलिसांना असतांनाही यांच्यावर कारवाई का केल्या जात नाही हा एक संशोधनाचा विषय आहे•

मेट्रोची कामे सुरू यात या वाहनांचा त्रास अनेकांना भोगावा लागतो वाहतूक विभागाला याची माहिती दिली तरी यावर कारवाई केल्या जात नाही.

बालेवाडीची याच्या पेक्षा भयावह परिस्थिती आहे बालेवाडी हाय स्ट्रिट मधील बार,पबआणि हॉटेल समोरिल पदपथावरच वाहने पार्किंग केल्या जाते• रात्रीच्या वेळेला या विभागात धांगड धिंगाना सुरू असतो बार,पब चालकच ग्राहकांना पदपथावरच पार्किंग करावयास लावतात कोणीही कोणालाही जूमानत नाही• एखाद्या वेळेस वाहतूक विभाग येतात थातूर- मातूर कारवाई करून जातात मग वाहतूक विभाग आणि हॉटेल चालकांचा आतून खेळ चालतो या खेळाखेळीच्या प्रकारात जनता भरडल्या जात आहे•

रात्रीच्या वेळेला मद्यधूंद होणारे युवक कोणासही जूमानत नाही• पुणे कल्यानीनगर अपघात प्रकरणास आठ दिवस होत आहे प्रकरण जास्त दिवसाचे नाही बालेवाडी रात्रीच्या वेळेला युवक/ युवतींचा स्वैराचार,झिंगाट खेळ सुरू होतो•दारू पिऊन यूवक मोटारसायकल चालवितात जर पकडले तरी वाहतूक पोलिसांना चिरीमिरी देऊन प्रकरण मिटवितांना दिसतात हे कोठ पर्यंत चालणार आहे सर्वच नियम धाब्यावर बसविण्याचा प्रकार या विभागात सुरू आहे•

यात बालेवाडी,बाणेर विभागात अनेक बांधकामे सुरू आहेत• खोदकामात माती,दगड,मुरूम वाहतूक करणारे ट्रकवर ही वाहतूक करतांना आच्छादन टाकून वाहतूक करण्याची परवानगी दिली होती असे न केल्यास यांच्यावर कारवाई करण्याचे निर्दश दिले होते असे असतांनाही यांच्यावर वाहतूक पोलिस कारवाई करत नाही दिवस भर आच्छादन न टाकता माती, मुरूम मोठमोठाले दगड वाहतूक करत राहतात •

पुणे -मुंबई हायवे जवळील पोस्ट ऑफीस जवळ हे ट्रक आणि जड वाहतूक करणारे कडून पैसे गोळा करणायातच वाहतूक विभाग गूंग असतात•वाहतूक विभागाच्या सैरवैर कारभाराचा खूपच कळस गाठला असल्याचे दिसत आहे• असल्या वाहतूक विभागाला कोण कशा प्रकारे योग्य वळण लावेल• एखादी मोठी घटणा घडल्या नंतरच यांचे डोळे ऊघडतील •

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!