महाराष्ट्र

रेल्वेचा जम्बो ब्लॉक! मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

रेल्वेचा जम्बो ब्लॉक! मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय

वेगवान मराठी

मुंबई,ता. 31 में 2024 – Mumbai University On Railway jumbo Block: मध्य रेल्वे मार्फत तांत्रिक कामासाठी दिनांक 30 मे 2024 रोजी मध्यरात्री पासून ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड यादरम्नयानदेखील ३६ तासांचा विशेष जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने आपल्या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाण्यातील विशेष जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या शिक्षक, अधिकारी / कर्मचारी यांना दिनांक 1 जून 2024 रोजी कार्यालयात येणे गैरसोयीचे होणार आहे.

या पार्श्वभूमीवर 1 जून 2024 रोजी मुंबई विद्यापीठ कार्यालय चालू ठेवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादिवशी शिक्षक, अधिकारी/कर्मचारी यांना सुट्टी देण्यात असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्याऐवजी दुसरा शनिवार, दिनांक 8 जून रोजी सुट्टीच्या दिवशी विद्यापीठ कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात कार्यालय प्रमुख तसेच विद्यापीठाशी संलग्नित / संचालित महाविद्यालयांनी आपल्या अधिनस्त विद्यार्थी / कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा पुढे ढकलल्या
तसेच मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 1 जून रोजी इंजिनीअरिंग सेमिस्टर 8 ची आणि बीएमएस 5 वर्षे इंटिग्रेटेड सेमिस्टर 2 ची परीक्षा होणार होती. ही परीक्षा विशेष ब्लॉकमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची पुढची तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे.

विद्यापीठातील सर्व विभागांचे संचालक / विभाग प्रमुख, सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाच प्राचाय, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल, संचालक, परिक्षा व मुल्यमापन मंडळ, वित्त व लेखा अधिकारी, समन्वयक, रत्नागिरी उपपरिसर, समन्वयक, ठाणे उपपरिसर, समन्वयक, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅड अप्लाईड सायन्सेस, कल्याण उपकेंद्र, सर्व उपकुलसचिव, स्था. नियंत्रक, मुद्रण व लेखन सामुग्री, विद्यापीठ अभियंता, सर्व सहायक कुलसचिव आणि कुलसचिवांच्या कार्यालयातील सर्व विभागांचे/कक्षांचे प्रमुखांना याची माहिती कळविण्यात आली आहे.

43 परीक्षा सुरळीत
आज 31 मे रोजी विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा होत्या. पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षेवर झाला नाही. विज्ञान शाखेच्या 3 परीक्षा, अभियांत्रिकी शाखेच्या 27 परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या 8 परीक्षा, मानव्य विज्ञान शाखेची 1 परीक्षा, आंतर विद्याशाखेच्या 4 परीक्षा या परीक्षा पार पडल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!