आरोग्यबीड

बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना पत्तीच्या निधनाची बातमी कळताचा पत्नीने

बीड जिल्ह्यातील खळबळ जनक घटना

वेगवान मराठी प्रतिनिधी –दि 21 नोव्हेंबर– बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालूक्यातील, खामकरवाडी येथील कन्हैय्यालाल पांडुरंग खामकर सर यांचे काल सायंकाळी ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने उपचारासाठी बीड येथे घेऊन जात असताना दुःखद निधन झाले.

या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या सुविद्य पत्नी यांना मिळताच त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी दाखल केले असताना त्यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

स्व. खामकर सर हे जिल्हा परिषद शाळा, शिंदेवस्ती, झापेवाडी येथे सेवेत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे. काल दिवसभर ते मतदान प्रक्रियेत सहभागी होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहे,

¶आष्टी मतदार संघाचे उमेदवार आणि भाजपा नेते सुरेश धस यांनी अंत्यविधीला उपस्थित राहुण श्रद्धांजली अर्पण केली ¶

स्व. खामकर सर हे माझे चांगले कार्यकर्ते व परिचयाचे होते. अनेक वेळा त्यांनी मला मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहताना खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही ईश्वराकडे प्रार्थना अशा शब्दात सुरेश धस यांनी खामकर कुटुंबियांना श्रद्दांजली अर्पण केली आहे,या घटणेमुळे खामकरांच्या नातेवाईकांसह पंचक्रोशीतील जनतेतुन हळहळ व्यकत करण्यात येत आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!