बीडमहाराष्ट्रराजकारण

बर्थडे स्पेशल,”रगेल” मास लिडर सुरेश आण्णा धस

A special edition of Vesera Marathi highlighting the career of people's leader Suresh Anna Dhas on his birthday.

लोकनेते सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्य वेगवान मराठी चा विशेषांक – संपादकीय लेख 

सुरेश आण्णा धस यांच्या कौटूंबिक, राजकिय व सामाजिक क्षेत्रातील कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा धावता अलेख !

वेगवान मराठी बीड -केशव मुंडे परळी वै.-माणसांची उत्तम पारख करण्यात शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्रातील दोन नावं प्रामुख्यानें येतात त्यातील एक आहेत विलासराव देशमुख यांचे बंधु दिलिपराव देशमुख तर दुसरे होते गोपीनाथ मुंडे यांचे जेष्ठ बंधु कै.पंडित आण्णा मुंडे,याच पंडित आण्णांच्या संपर्कात जि्.प.च्या माध्यमातून पंडित आण्णां जि.प.अध्यक्ष आसतानां सुरेश आण्णा धस आले;आणि त्यांच्यातील गुनवता पाहुण आष्टी मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाकडे स्वतःजबाबदारी घेऊण गोपीनाथ मुंडे यांच्या कडे सुरेश धस यांची शिफारस पंडित आण्णांनी केली व उमेदवारी घेतली,आणि सुरेश धस यांचा 1999 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय झाला….

त्यानंतर स्वभाविकच सुरेश धस आणि गोपीनाथ मुंडे यांचा संपर्क वृद्धिंगत झाला,याच सहवासामुळे सुरेश धसांचा आवाका आणि बुध्दीचातुर्य ओळखुण एक दिवस आपला टांगा देखील हा उलाळ करु शकतो याची जाणीव होताच गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश आण्णा धस यांची पावर आणि जवळचा वावर मर्यादित केला

याच अंतराचा फायदा उचलत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर विरोधक असलेल्या बारामतीश्वरांनी सुरेश आण्णां सोबत जवळीक वाढवत आपलसं करण्यात बाजी मारली,पंडित आण्णां जरी माणसं ओळखण्यात पारंगत आसले तरी, तो माणुस आपणास भविष्यात पर्याय ठरु शकेल किंवा शह देऊ शकेल हे ओळखण्याची कसब आण्णां कडे मुळीच नव्हती,तो दुर दृष्टिकोण गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होता याच कारणांमुळे जयसिंग गायकवाड आणि सुरेश आण्णा धस यांना त्यावेळी भाजपा पासुन दुर ठेवण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न केल्याचे बोलले जाते ..

सुरेश आण्णा धस यांचा परिचय देण्याची बीड जिल्ह्याला आवशकता नाही परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या मनात त्यांना जाणुन घेण्याची कुतुहुल आहे…👇

: सुरेश धस हे जामगाव,आष्टी येथील आहेत

संपुर्ण नाव :- श्री.धस सुरेश रामचंद्र

जन्म दिनांक :-२ फेब्रुवारी, १९७०

जन्म ठिकाण -:-चिखली, ता. आष्टी, जि. बीड

ज्ञात भाषा:-मराठी, हिंदी, इंग्रजी.

वैवाहिक माहिती –

:-विवाहीत पत्नी-सौ.संगिता व सौ.प्राजक्ता  छंद- वाचन, क्रिकेट व समाजकार्य, शिक्षण- बीए.एमएस, एकुण अपत्य 3  जयदत्त धस सागर धस,, १ मुलगी कु.मैथिली धस व्यवसाय:- शेती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व-२३१, आष्टी, पाटोदा, शिरूर,

छंद–क्रिकेट, चित्रपट,समाजकारण,राजकारण पत्ता. मुपो.जामगाव,ता.आष्टी,जि. बीड

त्यांनी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,ता.आष्टी, बीड येथे कला शाखेची पदवी पूर्ण केली आणि नंतर १९९३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे एमएस केले.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून सुरेश विजयी झाले .

त्यांनी 140,507 मते घेतली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, अपक्ष राजकारणी भीमराव आनंदराव धोंडे यांचा 77,975 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

1999 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करून जिंकून ते प्रथम आमदार झाले आणि 2004 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते कायम ठेवले .

2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांचा 34,690 मतांच्या फरकाने पराभव केला. 2014 मधील पुढील निवडणुकीत ते हरले आणि 2018 मध्ये उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरणांसाठी एमएलसी लढवले आणि महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडून आले.

2024 मध्ये पुन्हा एकदा चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले.

त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून काम केले . 11 जून 2018 रोजी त्यांनी महाराष्ट्र परिषदेत 526 मतांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मते मिळाली.

सुरेश आण्णा धसांचा आसा झाला राजकीय उदय 

१९९२ सरपंच ग्रामपंचायत जामगाव, ता. आष्टी, जि. बीड

१९९६ आष्टी तालुका दुध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाचे संचालक.

१९९७ जिल्हा परिषद बीड उपाध्यक्ष

१९९९ आष्टी विधानसभा सदस्य.

२००४ आष्टी विधानसभा सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवड

२००९ आष्टी विधानसभा सदस्य म्हणून तिसऱ्यांदा निवड

• संचालक, आष्टी दुध संघ

२००२ आष्टी दुध संघाचे अध्यक्ष

२) २००५ महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित

(महानंद), मुंबई संचालक पदावर निवड

१) २०१० महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित

(महानंद), मुंबई संचालक पदावर दुसऱ्यांदा निवड

२) २०१० महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण

समितीच्या अध्यक्षपदी निवड

३) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित (महानंद) मुंबई.

४) दिनांक ११ जून, २०१३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या महसूल मदतकार्य, भुकंप पुनर्वसन, सहकार व पणन व वस्त्रोद्योग, जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे राज्यमंत्री म्हणून शपथविधी.

2024 सार्वत्रिक लोकसभा,विधानसभा निवडणुक आणि नंतर आवाधा कंपनी,पवनचक्की प्रकरण व संतोष देशमुख खून प्रकरणी सुरेश धसांतील जनतेने पाहिलेला अक्रमक राजकीय नेत्याचा अवतार 👇नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांची कधी न पाहिलेली दुसरी बाजु जनतेसमोर आली , संतोष देशमुख खून प्रकरणातील घटना सभागृहात धसांनी ज्या पद्धतीने मांडली ती पाहता विरोधकांसह सत्ताधारी देखील सुरेश धसांच्या भुमिकेचे समर्थन करताना दिसले, बीडच्या मातीतील अक्रमकता,बोलण्याची बीड स्टाईल,अगदी सहजतेने संवेदनशील विषयास त्यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना आपलेसे करत समर्थन मिळवले व पर्यायाने सरकारला सुरेश धसांच्या सरसकट मागण्या मान्य करण्यास भाग पाडले…

दरम्यान सुरेश धसांच्या या भुमीकेची मिडीयाने दखल घेत सुरेश धसांसह संतोष देशमुख खून प्रकरणास उचलुन धरले ,यामुळे बीड पुरते मर्यादित असलेले सुरेश धस राज्यासह देशात प्रसिद्धिच्या झोतात आले त्यांच्या भुमिकेला जनमानसातुन एकतर्फी समर्थन मिळत होते,मराठा समाजातील तरुणाईच्या मनात त्यांनी विश्वासाचे स्थान मिळवले एवढेच नाही तर सर्वच जातीधर्माच्या लोकांच्या गळ्यातील ताईत कधी बनले ते कळले पण नाही…

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे बीड लोकसभेच्या उमेदवार होत्या आष्टी मतदार संघात भिमराव धोंडे,बाळासाहेब आजबे दरेकर नाना आणि सुरेश धस एवढ्या नेत्यांची फौज होती परंतु यांच्यापैकी आष्टी मतदार संघाची जबाबदारी कोणाकडे द्यायची हा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा धसांनी त्यांची भुमीका स्पष्ट केली , सामुहीक नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत,कोणालाही द्या परंतु एका कडेच जबाबदारी द्या आणि बाकी सर्वांनी सहभागी होऊण ईमानदारीने सहकार्य करायचे आशी भुमीका मांडली,

दरम्यान धसांची कार्यक्षमता आणि मतदारसंघातील संपर्क आणि लोकप्रियता बघता ती जबाबदारी स्वाभाविकच धसांकडे देण्यात आली आज कोणी काहीही आरोप करत आसले तरी लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी प्रामाणीक राहत आष्टी मतदार संघात एकहाती 32 हजाराची लिड मिळवुण दिली,त्यांच्याप्रमाणेच उर्वरित नेत्यांनी काम केले आसते तर ति लिड 50 हजाराचा आकडा पार करून पंकजा मुंडे यांचा विजय करणारी ठरली आसती,

हे मी ऐकिव नाही तर माझ्या अनुभवातुन व्यकत होत आहे,लोकसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊण ठेपले आसताना आमची मिडीया टिम बीड लोकसभेचा गुप्त सर्व्हे अर्थातच एक्झिट पोल घेण्यासाठी बीड आणि गेवराई मतदारसंघाच्या दौराऱ्यावर असताना सुरेश धस पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम करायलेत आशी सुचना मिळाली होती,मि जेवढा सुरेश धस यांच्या स्वभवाचा मागील 15 वर्षात अभ्यास केला होता तो सांगत होता हे शक्य नाही परंतु समोरुण जि माहिती देण्यात येत होती ती संशयास जागा तयार करत होती त्यातच धसांच्या बैठकीतील मुंडे साहेबांचा फोटो हटवण्यात आल्याचे व्हिडिओ आणि फोटो मला मिळाले

दरम्यान खरं काय ते जानुण घेण्याच्या उद्देशाने मी सर्व्हे सहकार्यांवर सोडुन दोन दिवस आष्टी मतदार संघात मुक्काम ठोकला व एका सामान्य नागरीकां प्रमाणे सुरेश धस यांच्या प्रचार दौराऱ्याचे वेळापत्रक घेउण पाठपुरावा केला आसता खालील गोष्टी आढळून आल्या

मराठा समाजातील तरुण वर्गामध्ये टोकाचा विरोध दिसत होता , जे गाव मराठा बाहुल असेल त्या काही ठिकाणी तेथील तरुण सुरेश धसांना उघड सांगत होते कि उग बेजार होऊ नका यावेळी आम्ही तुमचं ऐकुण मतदान करणार नाहित उलट यावेळी तुम्हीच आमचे ऐका आणि तुतारी वाजवा,या कोंडीमुळे सुरेश धस त्यांच्या स्वभावा प्रमाणे हात जोडून पुढे चालत असत परंतु काही ठिकाणचा तिव्र विरोध पाहता ! आणि विनंती करुण देखील काहीच उपयोग होणार नाही हे लक्षात येता तुम्हाली जे योग्य वाटेल ते करा पण चुकीच्या पद्धतीने कोणाचीच अडवणुक करु नका असे समजावत होते….

आणि ज्या गावांमध्ये ओबीसी समाज संख्येने आधिक होता त्या ठिकाणी मतदारांना हि निवडणुक वाटतेय तेवढी सोपी नाही आपल्या प्रतिष्ठेचा विषय आहे ताईसाहेब केंद्रात कैबिनेट मंत्री होणार आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपविण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना बळ देण्याची हिच योग्य वेळ त्यामुळे कोणीही गाफिल न राहता आपले योगदान देऊण ताईसाहेबांना लोकसभेत पाठवा आसे तळमळीचे आव्हाण करत होते…

यावरुण एकच निष्पन्न होते की जर सुरेश धसां ऐवजी इतरांना आष्टीची जबाबदारी दिली आसती तर ते 32 हजाराचे लीड देखील कमी झाले आसते कारण त्याही परस्थिती मध्ये मराठा समाजातील 30 टक्के मतदान सुरेश धस भाजपाकडे वळविण्यात यशस्वी झाले आहेत हे वास्तव आहे,

आणि मागच्या वेळी आष्टीतुन 70 हजाराचे लीड मिळाले होते त्याचे काय ? या प्रश्नाचे उत्तर हे जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे हे त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात 15 हजार हजारा पेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत मग काय त्यांचा मुलगा गद्दार समजायचा का ? स्वतः चे अस्तीत्व पंकजा मुंडे यांच्या जवळ अबाधित राखण्यासाठी तेथील निष्क्रिय नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने सुरेश धसांवर खापर फोडुण स्वताची लाल करुण घेण्याच्या केविलवाण्या प्रयत्नां पलिकडे या आरोपांमध्ये काडीचेही तथ्य समोर आलेले मला दिसले नाही

मिडीया आणि सुरेश आण्णा धस यांच्यातील जुगलबंदीतुन मराठवाड्यातील सर्व जातीधर्मांच्या अन्यायाला वाचा फोडणारा नेता मिळाल्याची जन भावना होतेय व्यक्त ! 

सुरेश आण्णा धसांमध्ये दडलेला अस्सल -मराठी शब्दांचा साहित्यक मिळाला ! परंतु एक परखड सत्य बोलणारा धाडसी नेता देखील मिळवला

मि गजनी मधील संजय सिंघानिया आहे,आक्का, आक्का चा आक्का, मी टाम &जेरी पाहत नाही,मि काय एवढा संत तुकाराम आहे का ? पंकजाताई वर माझा अक्षेप फक्त निवडणुकीतील विषयापुरता आहे,मि बालकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही,मुन्नी बदनाम हुई,मुन्नी की सुन्नी,इथुन पुढे मी हास्यजत्रा पाहणार नाही.इतरांनी भरल्या आसतील मि नाहीत भरल्या बांगड्या ! आणि अमुल तु या रगेलच्या वाट्याला येऊण चुक केलीस,या डॉयलागां मुळे विरोधकांना आणि मिडीयाला पण बुचकाळ्यात टाकुण मराठी साहित्यांतुन लुप्त होत चाललेल्या अस्सल मराठी शब्दांची साहित्यकांना एक प्रकरची साहित्यिक भेट सुरेश धसांनी दिली आहे

गोपीनाथ मुंडे, आणि विलासराव देशमुखां नंतर मराठवाड्यात जि राजकीय पोकळी निर्माण झाली होती,अलिकडील काळात मराठवाड्यात जातीपाती मुळे निर्माण झालेले दुषित वातावरण बघता कोणतरी याला आवर घालणारा सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेउण जाणाऱ्या एका सक्ष्म अनुभवी नेत्याची गरज होती ती पोकळी सुरेश आण्णा धस यांच्या सर्वसमावेशक घेतलेल्या भुमिकेमुळे भरुण निघण्याची जनतेच्या मनात भावना निर्माण झाली आहे,

आज घडीला काही मुठभर लोकांना सुरेश धसांनी घेतलेल्या भुमिकेचे वावडे वाटत आसले तरी वास्तवाचा विचार केला तर भविष्यात याचे सत्य पटायला वेळ लागणार नाही.सामान्य जनतेच्या डोळ्यावर आलेली झापडी जेंव्हा उघडेल तेंव्हा उघडेलच परंतु एका दुर्दैवी घटणेतुन मराठवाड्याला एक डोळस लोकनेता मिळतोय हि बाब देखील मित्र वनव्यातील दुख आढवायला आलेल्या गारव्यासारखीच आहे असेच म्हणता येईल.

सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्य वेगवान मराठी समुहा तर्फे समर्पित लेख आणि उज्जवल भविष्या साठी उदंड अयुष्याच्या अनंत शुभेच्छा –

लेख-पत्रकार,उप-संपादक-वेगवान मराठी —  {नमामि वैद्यनाथम् निवास परळी वै.} केशव मुंडे 8888 387 622 

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!