बीड

ठेवीदार कृती समितीच्या वतीने पत्रकार लक्ष्मण वाकडे यांचा सत्कार

Journalist Laxman Wakade felicitated on behalf of Depositor Action Committee Parli

केशव मुंडे वेगवान मराठी परळी जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे सर यांचा ठेवीदार कृती समितीच्या वतीने सत्कार सा.परळी परिसर दिवाळी अंकातून मल्टीस्टेट ठेवीदारांच्या व्यथांची लक्षनीय मांडणी

परळी वैजनाथ :दि 14 नोव्हेंबर
सा. परळी परिसर च्या दिवाळी अंकातून राजस्थानी मल्टीस्टेट व पतसंस्था ठेवीदारांच्या व्यथां “राजस्थानी नावाचे टायटनिक का बुडाले ?” अशा शीर्षकाखाली केलेली मांडणी ही लक्षनीय ठरली असून, ठेवीदारांच्या जगण्यावर याचा परिणाम कसा झाला,

परळी शहरातील तीन ठेवीदार पैशाची हाय खाऊन मरण पावले,सदरील संस्था बंद पडल्यामुळे परळी बाजारपेठेवर याचा कसा परिणाम झाला, ठेवीदारांचा संघर्ष, त्यांच्या व्यथा यासर्व परिस्थिचे आकलन करून जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे सरांनी अप्रतिम मांडणी मांडणी केली आहे. त्याबद्दल ठेवीदार कृती समितीच्या वतीने वाकडे सरांचा सत्कार करण्यात आला.

मागील अकरा महिन्यापासून राजस्थानी मल्टी स्टेट व पतसंस्था बंद झाली आहे. सर्व संचालक मंडळ फरार असून गुंतवणूक केलेल्या पैशाचं काय होणार या भीतीने सर्व ठेवीदार हवालदिल झाले आहेत. आपले पैसे परत मिळावेत याकरिता प्रशासकीय पातळीवर गुंतवणूकरांचा संघर्ष सुरु आहे.

“राजस्थानी नावाचे टायटनिक का बुडाले?” या शीर्षकाद्वारे साप्ताहिक परळी परिसरच्या दिवाळी अंकातून मल्टीस्टेट व पतसंस्था ठेवीदारांच्या व्यथांची लक्षनीय मांडणी करत लक्ष्मण वाकडे सरांनी दुःखीतांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. या भावनेतून ठेवीदार कृती समिती, परळी वैजनाथ यांच्या वतीने वाकडे सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य ठेवीदार उपस्थित होते.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!