शेती

निवडणूक झाली कांद्याबाबत केंद्राचा मोठा निर्णय Onion rate update

Today's market price onion

वेगवान मराठी / साहेबराव ठाकरे

नाशिक, ता. 22 नोव्हेंबर 2024- Onion Market  महाराष्ट्र मध्ये कांद्याचे सगळ्यात मोठे उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये घेतल्या जातं. नाशिक जिल्ह्याचं नगदी पिका कांदा म्हणून ओळखल्या जातं.  मात्र आता नाशिक सोबतच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडत असताना कांद्याला चांगला भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं, मात्र आता निवडणूक संपन्न झालेली आहे. मतदान रुपी दान महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदरात शेतक-यांी आणि ग्राहकांनी टाकले आहे.

लोकसभेच्या वेळी कांद्यावरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. कांद्याचे अचानक निर्यात बंदी केल्यामुळे केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धारेवर धरल होतं, एवढंच नाही तर अनेक ठिकाणी कांद्यामुळे महायुतीचे उमेदवरांना पराभवाचा सामना करावा लागला.

महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसामुळे नवीन लाल कांद्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे त्याचबरोबर उन्हाळा कांदा बाजारामधून संपत आल्यात जमा आहे त्यामुळे नवीन कांदा बाजारामध्ये दाखल झाला असून या नवीन लाल कांद्याला आता सध्या तरी चांगल्या प्रमाणात भाव मिळत आहे. मात्र आता कांद्याला ज्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी दिल्ली शहरामधूनही आहे.

Onion rate update कांद्याची आणखी एक  खेप रेल्वेने दिल्लीत दाखल झाली आहे. ही शिपमेंट रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी राजधानीत पोहोचली. नाशिकहून निघालेल्या “कांदा एक्सप्रेस” ने दिल्लीला 840 मेट्रिक टन कांदा पोहोचवला. या निर्णयामुळे दिल्ली-एनसीआरमधील कांद्याचे भाव कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चंदीगड, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार सोनीपतमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेल्या कांद्याला उतरवणार आहे.

नाशिकहून नाफेडने पाठवलेल्या कांद्याने भरलेला रेक दिल्लीच्या किशनगंज स्थानकावर दाखल झाला. 840 मेट्रिक टनांपैकी 500 मेट्रिक टन मदर डेअरीला, 190 मेट्रिक टन एनसीसीएफकडे आणि 150 मेट्रिक टन नाफेडकडे राहतील. हे कांदे दिल्ली-एनसीआरमध्ये ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जातील.

चौथी ट्रेन दिल्लीला पोहोचली

कांद्याची ही चौथी बॅच दिल्लीला पोहोचली आहे. या कांद्याची वाहतूक करणाऱ्या रेल्वेला “कांदा एक्सप्रेस” असे नाव देण्यात आले आहे. तत्पूर्वी, 1,600 मेट्रिक टनांची पहिली  खेप 20 ऑक्टोबर 2024 रोजी आली होती, 30 ऑक्टोबर 2024 रोजी 840 मेट्रिक टनांची दुसरी तुकडी आणि 12 नोव्हेंबर 2024 रोजी 730 मेट्रिक टनांची तिसरी तुकडी आली होती. आणखी 720 मेट्रिक टनांची शिपमेंट, या मालिकेतील पाचवी, सोमवारी नाशिकहून निघून दिल्लीत येण्याची शक्यता आहे 21 नोव्हेंबर पर्यंत.

नाशिक वरुन अनेक राज्यामध्ये कांदा एक्सप्रेस कांदा घेऊन जाणार असल्यामुळे कांद्याचे भाव अवक्यात येणार आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे शहरी भागातील जनता त्रस्त असली तरी कांद्याला एवढा भाव असनही शेतक-यांना  पैसे बनत नाही. याचे कारण म्हणजे शेतक-यांच्या पाहिजेत त्या प्रमाणात कांदा शिल्लक नाही. बाजारामध्ये मोठा तुटवडा असल्यामुळे कांद्याचे भाव चढे राहतात. देशामध्ये सरकार काॅंग्रेस राहो  की भाजपा शेतीमालाचे गणित मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक याचे भांडवल करुन शेतक-यांचा वापर करन घेतांना दिसत आले आहे.

नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे किती प्रमाणात उत्पादन निघते यावर पुढील लाल कांद्याच्या दराचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांची कांद्यावर नजर टिकून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!