सगळ मंत्रिमंडळच गोपीनाथ गडावर आणले असते पण-पंकजा मुंडे
12/12/2024 anniversary of the MUNDE saheb in gopinath gad PARLI BEED

केशव मुंडे-वेगवान मराठी प्रतिनिधी परळी –
12 /१२/ हि तारीख महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाची आहे हे राज्यातीलच नाही तर देशभरातील या दोन नेत्यांना ओळखणाऱ्यांना झोपेतुन उठवुण विचारले तरी ते अचुक सांगतील,आणि ते नेते म्हणजे एक शरद पवार तर दुसरे लोकनेते गोपीनाथ मुंडे,परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या 2014 साली झालेल्या अपघाती एक्झिट मुळे गोपीनाथ मुंडे या वादळावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या समर्थकांसह कुटुंबियांवर वाढदिवसाच्या ऐवजी जयंती साजरी करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे,
विषयाचे कारण असे कि परवाला मुंडे साहेबांची जयंती आहे 12 12 24 हाच मुद्द्याला धरुण गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार कन्या आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या अनुययांना खालील संदेश वजा आव्हाण केले आहे ते पहा 👇
पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी काय केले आहे आव्हाण — मराठवाड्यातील अभूतपूर्व यशाबद्दल महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्कार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोपीनाथ गडावर बोलावून 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सत्कार आणि अभिनंदन करण्याची माझी इच्छा होती.
परंतू शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही. असा जंगी कार्यक्रम मी नंतर भविष्यात घेईलच. परंतु सध्या मुंडे साहेबांची जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. 12 डिसेंबरला मी सकाळी 11 वा. गोपीनाथ गडावर येईल. सकाळी 11 ते दुपारी 2 वा. दरम्यान गडावर नेहमीप्रमाणे कार्यक्रम होतील.
ज्यांना यादिवशी यायला जमणार नाही. त्यांनी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आपापल्या गावांमध्ये, आपल्या वाॅर्डामध्ये मुंडे साहेबांची जयंती साजरी करावी व त्यांना अभिवादन करावे. आणि मुंडे साहेबांचे संस्कार जिवंत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहण्याचे वचन मला द्यावे.
#GopinathGad #12December #MundeSaheb

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.