क्राईम

महाराष्ट्रातून जाणा-या या रेल्वेमध्ये बॅाम्ब, अचानक फोन वाजला

वेगवान मराठी

चाळीसगाव, 10 डिसेंबर 2024 –  ०९.१२.२०२४ रोजी सुमारे २१.१६ वाजता, पोलीस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला २१.२८ वाजता ही माहिती लगेच कळवण्यात आली.

आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर व्यवस्थीत शोधा-शोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉड मनमाड यांच्या स्निफर डॉगचा वापर करण्यात आला. १ ते ४ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉंब अथवा कोणतीही संशयास्पद, आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. त्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.

तथापि, लाइव्ह लोकेशनच्या तपासणीत कॉलरचा तपशील त्याच्या स्टेशनजवळील स्थानासह उघड झाला. जळगाव येथील पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड, मनमाड यांनी त्वरित कारवाई केली आणि २३.२० वाजता संशयिताला पकडण्यात आले.

मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या आरोपी विकास एकनाथ पाटील याने खोटा बॉम्ब कॉल केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी NC क्र.१३३६/२०२४ नुसार दिनांक १०.१२.२०२४ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मध्य रेल्वे आरपीएफ आणि शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि जलद तपास कौशल्य दाखवून अवघ्या २ तासांच्या कालावधीत या प्रकरणाची उकल केली आहे.
————-
दिनांक: १० डिसेंबर २०२४
प्रप क्रमांक: २०२४/१२/११
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!