आंबा साखर ट्रक,कार,अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ
Ambajogai road accident matter 4 travelers Death

केशव मुंडे-वेगवान मराठी परळी -10-12-24 मंगळवार रोजी सकाळी 7 वाजता झालेल्या भिषण अपघातातील मृतांची संख्या 2 वरुण 4 झाली असुण जागीच ठार झालेल्या 2 प्रवाशांसह नंतर उपचारा दरम्यान दोघेजनांचा मृत्यु झाल्याने मृतांचा आतापर्यंत एकुण संख्या 4 झाली आहे
मित्राची पुणे येथे पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेही भोजनाचे आयोजन केले होते. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावचे मित्र दि. 9 डिसेंबर सोमवारी रात्री जेवणासाठी मांजरसुंबा (जिल्हा बीड) जवळ गेले होते. तेथे जेवण करून पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ मांजरसुंबा येथून निघून पुढे आंबाजोगाई लातुर रस्त्यामध्ये अंबासाखर कारखाना महामार्गाने रेणापुर कडे जात असताना अंबासाखर कारखाना जवळ समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर शिफ्ट कारची धडक झाल्यामुळे कारचा चुराडा होत शिफ्ट कार मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला झाला तर एकाने घटणे च्या थोड्या वेळा नंतर दम सोडला,यात मयत 1) बालाजी शंकर माने वय 27, 2)फारुख बाबुमिंया शेख वय 30, 3)दिपक दिलीप सावरे वय 28 , 4) ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू) झाले आहेत 1 ) 1मुबारक शेख, 2) अजिम पाशुभाई शेख 30 वय यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.