मनोज जरांगे,मस्साजोग,चे ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच ठरल !
The villagers of Massajog, the police administration and Manoj Jarange decided

केशव मुंडे -वेगवान मराठी बीड -11 /12/24 केज प्रतिनिधी- मस्साजोग ग्रामपंचायत चे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणास लागलेल्या हिंसक वळणा मुळे बीड जिल्ह्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे,
काल घडलेल्या घटनेबाबत केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उप निरीक्षक पाटील साहेब यांच्या कामगिरीवर मस्साजोग ग्रामस्थां कडुण आज प्रचंड रोष व्यकत करण्यात आला,या बरोबरच मिडियाने घेतलेली दखल व मराठा नेते मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबीयांना दिलेल्या भेटीचे आणि घडलेल्या घटणेचे गांभिर्य ओळखुण,बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ साहेब खडबडुण जागे होऊण आपल्या फौज फाट्यासह केज तालुक्यातील मस्साजोग या गावी दाखल झाले…
तत्पूर्वी बीड जिल्ह्यातील काही भागात संतोष देशमुख यांचे अपहरण करुण केलेल्या क्रूर हत्येच्या प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात मस्साजोग ग्रामस्थांसह केज तालुक्यातील संतप्त नागरीकांनी रस्त्यावर उतरुण आंदोलन उभे केले होते,या आंदोलना मुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता,काही हिंसक घटणा देखील घडल्या यामध्ये केज येथील एसटी डेपोची बस संतप्त जमावा कडुण पोलीसांनी देखत पेटवुण देण्यात आली,
या बरोबरच केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लावलेले धनंजय मुंडे यांचे बैनर्स फाडले गेले रास्तारोको आंदोलन अधिक वेळ सुरु राहिल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता,या घटनांच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील जिल्ह्यत येण्या अगोदरच या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणुण दोघा जनांणा अटक करण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासना कडुण सांगण्यात आले….
तरी देखील आंदोलनकर्ते माघार घेण्यास तयार होत नव्हते मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊण 24 तास उलटुण गेले तरी ग्रामस्थ मृत व्यक्तीचे पार्थीव स्विकारण्यास तयार होत नव्हते,त्यामुळे पोलीस प्रशासना पुढे मोठा पेच निर्मान झाला होता,दरम्यान मस्साजोग ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक बारगळ साहेब यांच्याशी चर्चा करून ग्रामस्थांच्या खालील मागण्या मांडल्या,1) प्रकरणाची सिबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी,2) मारेकऱ्यांना उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अटक करण्यात यावी,3) याच बरोबर आरोपीस पडद्या मागुण मदत करणाऱ्यास देखील चौकशी अंती अटक करावी 4) केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आणि उप निरीक्षक यांचे तात्काळ निलंबण करण्यात यावे,5) मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु शिवराज देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,या मागण्या बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ साहेब यांच्या कडुण मान्य करुण घेत ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला….
या प्रकरणात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सामंजस्याचा परिचय देत ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासना मध्ये निर्णायक भुमीका घेतली आहे,मात्र मयत संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंकार कधी होणार या बाबत बातमी लिहीपर्यंत तरी माहिती देण्यात आलेली नाही,…
या विषयी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांवर तिव्र शब्दात नापसंती दर्शविली असून कोणाचेही नाव न घेता तुमच्या लोकांना चांगले राहण्याचे शिकवा नाही तर परिणाम भयंकर होतील असा गंभीर इशारा दिला आहे
पोलीस प्रशासना सोबत झालेल्या चर्चेची माहिती ग्रामस्थानां देतानी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी बरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती देखील दिली असुण त्यांच्याकडुण कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार नसुण दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले,दरम्यान जर पोलीस प्रशासन आणि राज्यशासणा कडुण विश्वासघात झाला तर मी स्वतः हा लढा लढणार असल्याचे मनोज जरांगे यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगीतले आहे….

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.