बीडराजकारण

परळीच्या राजकीय पर्वाचा नवा आध्याय

A new chapter in the political era of Parli

वेगवान मराठी-केशव मुंडें -दिनांक 15 डिसेंबर 2024 बीड प्रतिनिधी- -परळीला महाराष्ट्राचे पॉलिटिकल हब म्हणुण का संबोधले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.महाराष्ट् राज्यातील अनेक जिल्हे असे आहेत की त्या जिल्हयांमध्ये महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी मोठ्या प्रमाणात निवडुण आलेले आहेत परंतु त्या जिल्हयांमध्ये एक ही आमदार मंत्रीमंडळात स्थान मिळवण्यात यशस्वी झालेले नाहीत.या उलट बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रकाश सोळंके सारखे वरिष्ठ आणि विजयसिंह पंडीतां सारखे तरुण घरंदाज नेते आसताना देखील धनंजय मुंडे हे प्रथम ठाकरे सरकार मध्ये,दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे सरकार मध्ये आणि आता तिसऱ्यांदा फडणवीस सरकार मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.विशेष म्हणजे या वेळी तर मस्साजोग प्रकरण ताजे होते स्थानीकच्या लोकप्रतिनिधींसह स्वपक्षीय नेत्यांचा देखील धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाला कडाडुण जाहीर विरोध होता,

एवढचं काय तर “धनंजय मुंडें यांना मंत्रीमंडळातुन डच्चू देण्यात आला असुण मस्साजोग प्रकरण अंगलट आले ” आशा अश्याच्या बातम्यांना चांगली प्रसिद्धि देण्यात आली परंतु धनंजय मुंडे यांचे पक्षातील योगदान आजित पवार यांचा असलेला विश्वास आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री अखेर क्षणी धनंजय मुंडे यांची राजकीय नौका बुडण्यापासुण वाचविण्यात कामी आलेली दिसुण आली आणि त्यामुळेच त्यांच्या नावावर शिकामोर्तब होण्यासाठी अखेरपर्यंत वाट पाहावी लागली आसली तरी त्यांची एकंदरींत उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागली आहे तर एकाच घरातील दोघांची कैबिनेट मंत्री पदी निवड झाली आहे हि बाब परळीचे राजकारणातील,सामाजीक व राजकीय म्हत्व आणि स्थान आधोरेखीत करते…….

पंकजा मुंडे यांच्याबाबतीत मात्र यावेळी कसलाही संघर्ष न करता व आढेओढे न घेता मंत्रीपदाची माळ गळ्यात पडली आहे,तरी देखील नाही म्हटले तरी विधानसभेचा निकाल लागल्या लागल्या आष्टीचे नवनिर्वाचित भाजपाचे वरिष्ठ आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचे गंभीर आरोप करणे सातत्याने सुरु ठेवले होते.सुरेश धस यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह राष्ट्रीय नेत्यांकडे देखील पंकजा मुंडे यांच्या बाबत तक्रारी केल्याचे सांगितले जाते,या बरोबरच काही राजकीय विरोधकांनी मस्साजोग प्रकरण देखील पंकजा मुंडे यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न चालविल्याचे बोलले जाते,या सर्वांवर मात करत यावेळी पंकजा मुंडे यांनी यावेळी आपली नौका यशस्वी रित्या पार केल्याचे दिसून येते.

दरम्यान 2019 साली झालेल्या परळी विधानसभा निवडणूकीतील धनंजय मुंडे यांच्याकडुण झालेल्या पराभवा नंतर पंकजा मुंडे यांच्या वाट्याला संघर्षच आला होता.त्यानंतर लोकसभा निवडणुकी मध्यें त्या इच्छुक नसताना देखील पक्षातील वरिष्ठांनी टिकिट देऊण बीड लोकसभेची निवडणुक लढवण्याचे आदेश दिले,या अटीतटीच्या लढतीमध्ये विरोधी उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या कडुण झालेल्या निसटत्या पराभवामुळे बीडसह मराठवाडय़ातील 5 तरुणांनी आत्महत्या केली होती,त्या घटणेमुळे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत राज्यातील जनतेमध्ये सहानुभुती निर्माण झाली होती तर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर देखील पंकजा मुंडे यांच्या संयमाची आणि जनभावनेची दखल घेण्यात आली होती,या सर्व बाबींचा सारासार विचार करून आणि विधानसभा निवडणूकीतील प्रचारा दरम्यान महायुतीच्या उमेदवारांची पंकजा मुंडे यांच्या सभांची मागणी व सभांमुळे महायुतीला झालेला फायदा लक्षात घेता घराणेशाहीचा निकष आणि अंतर्गत विरोध बाजुला ठेऊण ओबीसी आणि लाडक्या बहिणींची प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशा कडे पाहीले जात आहे, एकंदरींत काय तर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असुण अखेरच्या क्षणी का होईणा पण धनंजय मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने परळी ची राजकीय हब म्हणुण गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केलेली ओळख टिकविण्यात साहेबांचे दोन्ही वासरं आणि परळी करांचे धनुभाऊ आणि ताईसाहेब यशस्वी झाले आहेत एवढे मात्र निश्चीत….

@keshav dnayanoba munde Wegwan marathi parli vaijnath maharashtra 431515 { 8888 387 622 }

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!