
!! गुन्हे शाखेची जबरी कामगिरी !! अट्टल गुन्हेगार आसलेल्या परलीतील सराईत चोरांना बेड्या !!
( धर्मापुरी परळी येथील काँपर वायरची जबरी चोरी करणारे गुन्हेगार मुद्देमालासह गजाआड)
वेगवान मराठी केशव डी मुंडे परली वैजनाथ मा. पोलीस अधीक्षक साहेब, सो बीड यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी व दरोडा इत्यादी मालमत्तेचे विरूध्द गुन्हे उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत. दि. 17.10.2025 रोजी फिर्यादी नामे लक्ष्मण बापुराव चाटे रा. खापरटोन ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी पोस्टे परळी ग्रामीण येथे फिर्याद दिली की,
ते वॉचमन म्हणुन कामास असलेल्या धर्मापुरी येथील सोहेल ऑईल मिलमध्ये डिट्युवर असतांना दि. 17.10.2025 रोजी रात्री 01.00 वा ते पहाटे 04.00 वाचे दरम्यान अनोळखी चोरट्याने त्याचे हात, पाय बांधुन, चाकु व लाकडी काठ्या दाखवुन, धमकी देवुन, मिल मधील लाईटच्या डिपीतील तांब्याची तार, आईल व स्टील प्लेट असा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याची तक्रार दिली होती.
त्यावरून पोस्टे परळी ग्रामिण येथे गुरन. 439/2025 कलम 309 (4),324(2)351(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरील दाखल गुन्ह्यातील अनोळखी गुन्हेगाराचा स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउपनि सुशांत सुतळे, पोह 1429 रामचंद्रकेकान, 989 विष्णु सानप, 1918 गोविंद भताने, पोअ 1055 सचिन आंधळे असे शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,
वरील गुन्ह्यातील ताब्याची तार इसम नामे 1) बाळु उर्फ संतोष सोपान कांबळे रा. मिलीदनगर परळी वैजनाथ जि. बीड 2) नजमोद्दीन बशीर शेख रा.बरकत नगर परळी वैजनाथ जि.बीड यांनी व त्यांच्या साथीदाराने चोरून त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे लपवुन ठेवली आहे.
मिळालेली माहिती पोनि शिवाजी बंटेवाड यांना देवुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता
त्यांनी सदर गुन्ह्यातील तांब्याची तार, त्यांचे इतर साथीदार नामे 3) सतिष रघुनाथ मुंडे रा. नागदरा ता. परळी वैजनाथ 4) सलीम शेख रा. केज जि. बीड असेंनी मिळुन चोरी केल्याची कबुली देवुन चोरीतील मुद्देमाल काढुन दिल्याने त्यांच्याकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 140 किलो तांब्याची तार किमंती अंदाजे 1,26,000/-रूपये प्रमाणे जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मँडम व पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सुशांत सुतळे, पोह 1429 रामचंद्र केकान, 989 विष्णु सानप, 1918 गोविंद भताने, पोअ 1055 सचिन आंधळे यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








