बीड

तर खासदाराच्या अंगावर चड्डी देखील राहणार नाही

Faujdar's threat to the MP if he takes the press, there will be no shorts on his body

वेगवान मराठी बीड K.D.MUNDE दि-5 जानेवारी बीड- सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ‘बीड पोलीस प्रेस ग्रुप ’वर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. ज्यामुळे पोलीस दलात वादळ उठले. ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’ अशी पोस्ट मुंडे यांनी केली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. या हत्येचा तपास आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन पातळीवर सुरु झालेला आहे. या हत्येच्या पाठीशी जे राजकीय लोक आहेत, त्यांच्याबद्दल जनमाणसात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील सपोनि.गणेश मुंडे  आणि सपोनि.दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे. खासदार सोनवणे यांच्या मागणी नंतर बीड पोलीसांमध्ये खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री सपोनि गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हाटस्अप ग्रुपवर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली,ज्यामध्ये म्हटले होते की, ‘या खासदाराची चड्डी सुध्दा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’. असे म्हटले आहे. या पोस्टचा रोख कोणाकडे आहे असे पत्रकारांनी विचारताच ‘समझने वालो को इशारा ही काफी है..’ असा रिप्लाय मुंडेंनी दिला. दरम्यान चर्चा वाढू लागल्यानंतर सदरील पोस्ट एपीआय गणेश मुंडे यांनी डिलिट केली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.उस्मान शेख यांनी मुंडे यांना ग्रुपमधून काढून टाकले.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!