वाल्मिक कराड यांच्यावर मकर संक्रातीच्या दिवशी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल
Case registered against Valmik Karad under Makoka in Santosh Deshmukh murder case

अखेर वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाच
● कराड समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केज – दिनांक-14 जानेवारी ऐण मकर संक्रातीच्या दिवशी आणि भगवानबाबांच्या पुण्यतिथी च्या दिवशीच वाल्मिक कराड यांच्यावर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी,खुनाच्या गुन्ह्यात 302 आणि खंडणीच्या गुन्ह्यात मकोका आशा प्रकारच्या कलमांखाली गंभीर स्वरुपाचे खटले दाखल करण्यात आले आहेत, खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडवर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तत्पूर्वी, केज कोर्टाने अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यानंतर हत्या प्रकरणात एसआयटीने कराडला ताब्यात घेतलं आहे.
खंडणी प्रकरणात आत्मसमर्पण केल्यानंतर वाल्मिक कराड यास १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. याची मुदत संपत असल्याने पोलिसांनी मंगळवारी कराडला केज न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मात्र, त्यानंतर झालेल्या एका स्वतंत्र सुनावणीत कराडचा ताबा एसआयटीला मिळाल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी एसआयटीकडून कराडला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होताच परळीत वाल्मिक कराड समर्थकांनी परळी बंद करत केले आंदोलन तिव्र
वाल्मीक कराडवरील खोटे गुन्हा मागे घ्यावेत या मागणीसाठी आईसह समर्थकांचे परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी कराडच्या एका समर्थकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
इतर आंदोलक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला थांबवल्यामुळे पुढील अनर्थ ठरला. काही समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून तर काही जणांनी टॉवरवर चढून आंदोलन. काही आंदोलकांनी बसवर दगडफेक केल्याचीही माहिती आहे. वाल्मीक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली असून वातावरण अधिकच तापले आहे.
काय आहे MACOCA कायद्दा आणि त्याची व्याप्ती
• महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अॅक्ट (MCOCA) म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला.
• हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही.
• कायद्यात आशा आहेत तरतुदी –
मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपत्र दाखल करण्यासाठी मिळतात.
• हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील, तेव्हाच हा कायदा लावला जातो. या कायद्यातंर्गत आरोपीचा कबुलीजबाब नोंदवता येतो.
• त्या कबुलीजबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो. मकोको कायदा फरार आरोपीवरही लावता येतो. त्याची संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येते.
• मकोका कायदा कठोर आहे. हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही. यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. गुन्हा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतो, त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपींवर टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो.
• शहरी भागामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका त्या – त्या प्रकरणांत लावला जातो.
• एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो. 180 दिवसापर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते.
• मकोका लागल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही. पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. मकोका गुन्ह्यात किमान 5 ते 10 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.