बीडमहाराष्ट्र

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने नागरीकांनी ऑनलाइन अर्ज भरावेत-राज्य सेवा हक्क आयुक्तांचे आव्हान

Citizens should fill online applications with the help of information and technology-state service rights commissioner's challenge

माहिती व तंत्रज्ञानाचा बदल लक्षात घेता सर्व नागरिकांनी ऑनलाईज अर्ज भरावेत

    राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव

 वेगवान मराठी K D MUNDE –बीड, दि,15,(प्रतिनिधी ) माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात झपाटयाने झालेला बदल पाहता आपल्या कामाचा निपटारा लवकर होण्याच्या दृष्टीने व शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे वक्तव्य राज्य सेवा हक्क आयोगाचे  आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध विभागाच्या आढावा बैठकी प्रसंगी केले.

यावेळी ते म्हणाले की, आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी तिथे कोण कोणते कामाचे फॉर्म ऑनलाईन भरल्या जातात त्यासाठी दर्शनी भागात बोर्ड लावून त्यावर सर्व माहिती मराठीत लिहून ठेवावी, तसेच तिथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तक्रार पेटी, विहीरीसाठी अनुदान बाबत माहिती , इतर सुविधा असायला हव्यात, या केद्रांची संबधित अधिका-यांनी वेळो-वेळी तपासणी करुन त्यांना सूचना द्याव्यात.

            जिल्हयात 38 विभाग आहेत ज्या विभागातील अपिलीय अधिका-यांनी ऑनलाईन पध्दतीने चांगली कामे केली आहेत त्या अधिका-यांचा 26 जानेवारी  किंवा  15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबधित विभागाला दिल्या.

आपले सरकार सेवा केंद्रातील अधिकच्या माहितीसाठी शाळा व महाविद्यालयामध्ये  कॅम्प घेतले तर  विद्यार्थ्यांना  पोर्टलची माहिती होईल, आपल्या हक्काची पायमल्ली होऊ नये यासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांनीही स्वत:च्या प्रोफाईलवरुन अर्जाचे अपिल करण्याकडे लक्ष द्यावे. आपले सरकार सेवा पोर्टल महाराष्ट्र हे पहिले राज्य होते, पण ते आता 26 क्रमांकावर आहे, हे पोर्टल गतिमान करुन अधिक सक्रीयतेने व सुलभरित्या व्यापक स्वरुपात नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा देण्यासाठी संबधित विभागाने प्रयत्न करावेत असेही डॉ. जाधव यावेळी म्हणाले.

बीड जिल्हयातील सन 2023- 2024 च्या झालेल्या कामाबद्दल डॉ.जाधव यांनी समाधान व्यक्त केले तसेच 2025 च्या कामात शासन अधिक गतीने  प्रलंबित कामाचा निपटारा करील अशी आशाही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, अधिकारी आदित्य जीवने, अपर जिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन) चे शैलेश सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, श्री.इंगोले, उपविभागीय अधिकारी श्री.लाटकर, तहसीलदार चंद्रकांत शेळके विविध विभागाचे संबधित अपिलीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!