
वैद्यनाथ विद्यालय SIT च्या जाळ्यात रणजीत देशमुखची थेट एस.पी.नवनीत कावंत कडे बोगस शिक्षक भरतीची तक्रार
केशव डी मुंडे वेगवान मराठी परळी प्रतिनिधी -दिनांक 7 जुलै 2025 शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आधिवेशानात बोगस शिक्षक भरती घोटाळ्यावर SIT नेमण्याची घोषणा केली आहे. माघील काही दिवसापासून वैद्यनाथ विद्यालय परळी वै. हि शाळा बोगस शिक्षक भरती घोटाळ्यसाठी खूप चर्चेत आहे. या शाळेमध्ये १-२ नव्हे तर २० च्या जवळपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बोगस रित्या भरण्यात आलेले आहे.
जुन्या तारखेचे नियुक्त्या दाखवून व सह्या स्कॅन (SCAN) करून हे नियुक्त्या घेण्यात आलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर या बोगस कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनच्या नावाखाली शासनाची आर्थिक फसवणूक रून लाखोचे थकीत वेतन उचलले आहे.
काही शिक्षक तर शाळेत रुजू नसून पगार उचलतात. वारंवार तक्रार करून देखील शिक्षणाधिकारी व उपसंचालक कार्यालय या प्रकरणी कोणतीही दखल घ्ययला तय्यार नाहीत.
मे २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे या शिक्षकांच्य नियुक्त्या मे २०१२ पूर्वीच्या दाखविलेल्या आहेत.
खर तर हे सर्व शिक्षक २०१२ पासून शाळेत कार्यरत नाहीत त याचे हि पुरावे रणजीत रणजीत देशमुख यांनी बीड अधीक्षक कार्यालयात दाखल केले आहे.
या आर्थिक घोटाळ्यातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी, तत्कालीन संस्थाचालक, मुख्याध्यापक यांचे बँक खाते तपासण्यात यावे.
हा घोटाळा पूर्व नियोजित व संगनमताने केलेला असल्याने यात सामाविष्ठ असलेल्या सर्वांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी.
या आर्थिक घोटाळ्यात बनावट कागदपत्रे तय्यार करणे, बनावट स्वाक्षऱ्या करणे, बनावट शालार्थ ID तयार करणे, बनावट नियुक्ती पत्र देणे, बनावट मान्यता देणे, आर्थिक अनियमितता करणे, आर्थिक रक्कम स्वीकारणे
(लाचलुचपत) या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, तसेच प्रत्येक शिक्षकाचे खात्यावर जी रक्कम कोषागार कार्यालयाकडून जमा झाली आहे ती संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे,
जो पर्यंत रक्कम वसूल होत नाही तो पर्यंत यात समाविष्ठ असलेले मुख्याध्यापक, तत्कालीन संस्था कार्यकारी मंडळ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, PAY UNIT कार्यालय अधीक्षक व वेतन अधीक्षक व शिक्षण उप संचालक
यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात अशी लेखी तक्रार रणजीत देशमुख यांनी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे केली आहे.
रणजीत देशमुख यांनी शिक्षण विभागाला वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
आता या सर्व गोष्टींना कंटाळून, वैद्यनाथ विद्यालयात झालेल्या बोगस शिक्षक भरतीची तक्रार दि. ०२.०७.२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक कार्यालया बीड येथे केलेली आहे आणि वैद्यनाथ विद्यालयावर SIT लावण्याची मागणी केली आहे.
आता बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत या प्रकरणी कोणती कार्यवाही करतील यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे.
( शाळेत शिक्षक रुजुच नाही आणि काढला पगार गट शिक्षणाधिकारी पं.स. परळी यांची कृपा )
संस्थेचे वाद असल्यामुळे सध्या वैद्यनाथ विद्यालयावर प्रशासक म्हणून, मुख्याध्यापक पदी वैद्यनाथ विद्यालयाचा काहीही अभ्यास नसणारे परळीचे गट शिक्षणाधिकारी कणाके यांच्याकडे आहे. संस्थेत वाद असल्याचा फायदा घेत कणाके यांनी मनमानी कारबार सुरु केला आहे.
शाळेत कार्यरत नसलेल्या व रुजू नसलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार ते काढत आहे व माहिती अधिकारात काही मागितल्यास उत्तर न देता दिशा भूल करत आहेत, आणि शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना वचविण्याचा काम परळी तालुका गटशिक्षणाधिकारी कणाके करत आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








