क्राईमखेळछत्रपती संभाजी नगरपुणेबीड
घरात घुसून दिवसा ढवळ्या गोळीबार करणारा गणेश चव्हाण गजाआड
Ganesh Chavan, who fired in Morewadi, was shackled in 4 hours

वेगवान मराठी K D MUNDE दिनांक 17 जानेवारी 2025 -आंबाजोगाई येथील मोरेवाडी भागातील माऊली नगर येथील रहिवाशी नवनाथ कदम यांच्या घरासमोरच लातुर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करत कदम परिवारावर हाल्ला चढवुण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पंडित चव्हाण याचा कदम यांच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता.
मागील काही दिवसांपासूनच गणेश चव्हाण सतत धमक्या देत होता. याबाबत कदम कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
17 जानेवारी रोजी सकाळी गणेश चव्हाण कदमांच्या राहत्या घरी येउण वाद घालत सिद्धेश्वर कदम याच्या वर गोळी झाडली सुदैवाने गोळी सिद्धेश्वर याला लागली नाही त्यामुळे मोठा अपघात टळला
गोळी झाडण्यासाठी गणेश चव्हाण यानी गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती आहे.
घटनेनंतर तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तपास करत आहेत.
गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊण चार तासाच्या आत फरार झालेल्या आरोपीला रेणापुर जवळील ज्वारीच्या शेतामध्ये लपुण बसलेल्या ठिकाणाहुण ताब्यात घेवुन अटक करण्यात आल्याची माहिती आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.






