बीड जिल्हा रत्नांची खाण ! पण मुठभर लोकांमुळे होतेय घाण
Beed district gem mining is being done by a handful of people

-K.D.MUNDE वेगवान मराठी बीड प्रतिनिधी 23 जानेवारी 2025 —प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत
खो खो स्पर्धेत भारतीय संघाचे नेत्रत्व करणाऱी बीड ची लेक प्रियंका इंगळे असो कि वायुदलातील फ्लाइंग आफिसर दामिनी डी देशमुख ( D D D ) क्रिकेट क्षेत्रातला सचिन धस आसो बीड जिल्ह्यातल्या माती मध्ये कष्ट,आणि संघर्षा बरोबरच क्रिडा,कला,आणि शैक्षणीक साहित्य क्षेत्रात देखील स्वकर्तृत्वाने यशाला गवसणी घालणाऱ्या गुनवंतांची संख्या मोठी आहे…
परंतु अलिकडील काळात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील असामाजिक वृत्तीच्या तत्वांचा उदय झाला आणि बीडच्या ऐतिहासीक वैभवाला आणि बीड जिल्ह्यातल्या माणसांच्या माना खाली घालण्या सारखे निच्च कृत्य केले, थोडेबहुत आसे लोक सोडले तर बीड जिल्हा हा रत्नांची खाण आहे म्हटले तरी ते वावगे होणार नाही …
वेगवान मराठी 8888 387 622 जाहिराती साठी संपर्क करा , के.डी.मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.