बीड येथील बडे,आणि सिरसाट वस्तीवर दरोडा टाकणारे कुख्यात गैंग ताब्यात
Attackers on Bade and Sirsat settlements in Beed in police net

वेगवान मराठी बीड K.D.MUNDE-दिनांक 25/01/2025
कुख्यात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांनी केले जेरबंद
दरोडेखोरांकडुन दोन दरोडे व दोन घरफोडया उघड करुन पाच लाखाचा मुद्देमाल जप्त
मा.पोलीस अधीक्षक, बीड यांनी बीड जिल्हयातील उघडकीस न आलेले दरोडे, जबरी चोरी, घरफोडी,चोऱ्या या असे मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पो.नि.श्री.उस्मान शेख यांना दिले होते.
त्यावरुन पो.नि. श्री. उस्मान शेख यांनी आपल्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यांना उघडकीस नसलेल्या गुन्हयांचा आढावा घेवुन योग्य मार्गदर्शन केले आहे.
पोलीस स्टेशन शिरुर(कासार) हद्दीतील जाठवड गावातील वस्तीवर दिनांक 27/12/2024 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याचे सुमारास फिर्यादी बापु तुकाराम सिरसट वय 65 वर्षे, व्य.शेती रा. टेकीवस्ती जाटवड व त्यांचे शेजारी असलेले तुकाराम एकनाथ बडे रा. टेकीवस्ती अशा दोन्ही राहत असलेल्या घरावर अचानक पाच ते सहा अज्ञात इसमांनी चाकुचा धाक दाखवुन, काठीने फिर्यादी व फिर्यादीस पत्नीस मारहाण करुन घरातील व अंगावरील सोन्या चांदी व नगदी असा एकुण 2,50,000/- रु चा मुद्देमाल दरोडा टाकुन लुटून नेला होता.
वरील गंभीर दरोडयाचे घटनेचे अनुषंगाने तात्काळ पो.नि. स्था.गु.शा. बीड यांनी अधिपत्याखालील पथकाला सदरचा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले व अभिलेखावरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची गोपनिय माहिती काढण्यास सुरुवात केली.
दिनांक 25/01/2025 रोजी स्था.गु.शा.बीड येथील पोलीस अंमलदार विकास वाघमारे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, जाटवड येथे झालेला दरोडा हा संभाजी गौतम पवार व त्याचे इतर साथीदाराने केला असून ते उमापुर फाटा येथे आहेत अशा खात्रीलायक बातमीवरुन पो.नि. स्थागुशा यांनी स्था.गु.शा. बीड येथील पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे व पोउपनि श्रीराम खटावकर यांचे पथकाला आरोपी शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गेवराई ते शहागड जाणाऱ्या रोडवरील उमापुर फाटा येथे सापळा लावुन आरोपी नामे 1. संभाजी गौतम पवार वय 22 वर्षे रा. टाकळी अंबड ता.पैठण जि.संभाजीनगर व 2) गणेश वर्जा भोसले वय 28 वर्षे रा.थेरगांव ता.पैठण जि.संभाजीनगर यांना शिताफीने पकडुन त्यांना गुन्हया अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांचे इतर साथीरांसह लुटीचा प्रकार केला आहे.
तसेच त्यांचेकडे अधिक तपास केले असता वरील दरोडयाचे गुन्हयाचे व्यक्तीरिक्त खालील नमुद गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. त्यांचेकडुन एकुण 04 गुन्हे उघडकीस आलेले ओहत.
1) पो.स्टे.शिरुर गु.र.नं 221/2024 कलम 310(2) बी.एन.एस. (दरोडा)
2) पो.स्टे.चंकलबा गु.र.नं 363/2024 कलम 310(2) बी.एन.एस. (दरोडा)
3) पो.स्टे. गेवराई गुरंन नंबर 344/2024 कलम 331(4), 305 बी.एन.एस.(रात्रीची घरफोडी)
4) पो.स्टे. गेवराई गुंरन नंबर 27/2025 कलम 331(4), 305, 3(5) बी.एन.एस(रात्रीची घरफोडी)
यातील आरोपी नामे संभाजी गौतम पवार यांचा अभिलेख पाहता पो.स्टे.तलवाडा, पाचोड,पैठण येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत.
तसेच गणेश वर्जा भोसले यांचा पुर्व अभिलेख पाहता पाचोड, करमाड, बिडकीन या पो.स्टे.अंतर्गत त्याचेवर दरोडा टाकणे, दरोडयाची पुर्व तयारी करणे, घरफोडी करणे असे गुन्हयाचा अभिलेख आहे.
नमुद आरोपी यांचेकडुन दरोडयाचे 02 व घरफोडीचे 02 गुन्हे असे एकुण 04 मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे मध्ये निष्पन्न झालेले असून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्था.गु.शा.बीड यांना यश आलेले आहे
. आरोपींचे ताब्यातुन 5.2 तोळे सोने, 2.6 तोळे चांदी, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल व चाकु जप्त करण्यात आलेला असून 04 गुन्हयातील एकुण 5,18,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित निष्पन्न आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे.
वरील कामगिरी मा.श्री. नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक,बीड व पो.नि. श्री. उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे, पोउपनि श्रीराम खटावकर, ग्रेड पोउपनि तुळशिराम जगताप, कैलास ठोंबरे, मनोज वाघ, अशोक दुबाले, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, अर्जुन यादव, विकी सुरवसे, चालक सुनिल राठोड व सिध्दार्थ मांजरे यांनी मिळुन केला आहे.
वेगवान मराठी बीड जाहिरातीसाठी संपर्क ——-8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.