ज्ञानराधा मल्टीस्टेट चा एमपी आयडी प्रस्ताव सादर एकुण किती मालमत्ता जप्त ?
MPID proposal of Gnanaradha Multistate submitted! Total amount of assets seized

वेगवान मराठी बीड K.D.MUNDE-दि.25/01/2025 ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चे विरूद्ध दाखल गुन्हयातील आरोपीतांच्या स्थावर व जंगम 80 मालमत्तेचा एमपीआयडी प्रस्ताव मा. अपर पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो.लि.बीड चे बीड जिल्हयात २३ शाखा असुन सदर मल्टीस्टेट विरूद्ध बीड जिल्हयातील विविध पोलीस स्टेशनला आजपावेतो ६३ गुन्हे दाखल झाले असुन फिर्यादी मधील एकूण ४८,५१,७२,०२३/- रूपयाचा अपहार झालेबाबत तक्रारीमध्ये नमूद आहे.
तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेटवे आजपावेतो आर्थिक गुन्हे शाखा, बीड येथे एकूण ११२११ ठेवीदार त्यांच्या एकुण ६३६,२६,९९,४५७/- रूपये रकमेची विश्वासघात व फसवणूक झालेबाबत तक्रारी व त्याचाचतचे पुरावे या शाखेत दिलेले आहेत.
त्यावरून गुन्हयाचे तक्रारीमधील व प्राप्त ठेवीदार यांचे अर्ज असे एकूण-६८४,७८,६३,४८०/- रूपये रकमेची फसवणुक इ शालेबाबत माहिती आजपर्यंत प्राप्त झालेली आहे. व त्यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देविदार यांचे तक्रारी अर्ज स्वीकारण्यासाठी आगुशा बीड येथे स्वतंत्र पथक तयार करण्यात आलेले आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सो.लि. बीड चे आरोपी संचालक मंडळ व इतर अधिकारी कर्मचारी यांचे नावावर असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांची मा. नोंदणी महानिरीक्षक, यांचे कार्यालय, पुणे येथुन व स्थानिक सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे बीड जिल्हयातील विविध शाखे मधुन माहिती प्राप्त केली असता सदर मल्टीस्टेट मधील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांचे नावे असलेली स्थावर मालमत्तेची माहिती प्राप्त झालेली आहे
त्यापैकी ८० मालमत्ता असलेला MPID प्रस्ताव पुढील कायदेशीर कारवाईसाठी ईकडील कार्यालयाचे जा.क्र.वाचक१/आ.गु.शा./रा.म/एमपीआयडी / प्रस्ताव/२०२५-७४३ बीड दि.२४/०१/२०२५ अन्वये. मा. अपर पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये चार वाहने (जीप), जालना रोड, बीड मुख्य शाखेतील एक सीपीयू व जालना रोड शाखेतील दोन सौपीयु व मुख्य कार्यालय बीड येथुन महत्त्वाचे दस्तऐवज असा एकुण
रुपये ३२,८०,०००/- रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मुख्य शाखेचा पंचनामा करून ६,३४,३९०/- रोख रक्कम तसेच सारडा संकुल शाखेतून ७३ ग्रॅम सोन व अंदाजे २५० ग्रॅम चांदीच्या मौल्यवान वस्तु जप्त केले असुन त्याची एकुण-किंमत-३०३१००/-रू किंमतीचे मौल्यवान दागीने जप्त करण्यात आलेले आहे त्यांची एकुण किंमत-४२,१७,४९० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.
तसेच सदर गुन्हयामध्ये आजपावेतो संचालक मंडळातील व इतर अधिकारी कर्मचारी यांचे एकुण-२५६ बैंक खाते निष्पन्न केलेले आहे.
त्यापैकी चालु स्थितीत असलेले बैंक खाते ४७ आहेत त्यापैकी ४४ बैंक खाते फ्रिज केलेले असुन त्यामध्ये ६९,२८,६३६/- रूपये फ्रिज करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्थेतील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम (MPID ACT) १९९९ अन्वये पुढील कार्यवाहीसाठी एमपीआयडी प्रस्ताव मा. अपर पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांचे कार्यालयात पाठवण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छ. संभाजी नगर परीक्षेत्र, छ. संभाजीनगर, मा. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड, मा. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, विश्वांभर गोल्डे उपविपोअ बीड तथा पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा येथील पोनि, एस. एस. शेजाळ, सहा. पोलीस निरीक्षक, आर. एम. घोळवे, पी. एस. भागीले, सफी मुकुंद तांदळे, राख, वाघ, पोह-मेहत्रे, रामदास तांदळे, ठोंबर पोलीस अंमलदार, संजय पवार, यांनी केलेली आहे.
वेगवान मराठी बीड जाहिराती साठी संपर्क K.D.MUNDE-8888387622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.