नवनीत कॉवत यांच्या दमदार कामगीरीचा अहवाल जनतेसमोर सादर
The report of Superintendent of Police Beed's work is presented to the public

* पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्याचा पदभार सांभाळल्या नंतरचा त्यांनी केलेल्या कामगीरीचा केला अहवाल सादर !
एक सक्ष्म आधिकारी काय परिवर्तन करु शकतो याची चुणुक नवनीत कॉवत यांनी एका महिण्यात दाखवुण दिली आहे…
वेगवान मराठी बीड केशव मुंडे दिनांक 21/12/2024 रोजी पासून दिनांक 31/01/2025 पावेतो बीड पोलीसांनी केलेली कामगिरी
अवैध धंदे बाबत सन 2024 या संपूर्ण वर्षामध्ये दारू, जुगार, वाळू, गुटखा इत्यादींच्या (3107) गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकूण (8,22,82,520/-) मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
दिनांक 21/12/2024 रोजी पासून दारूप(494), जुगार (133), वाळू (24), गुटखा (20) असे एकुण (671) गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकूण (3,25,66,554/-) मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. म्हणजेच मागील वर्षभरात केलेल्या कारवाईच्या तुलनेत एकाच महिन्यात 40% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये वाळूचा मुद्देमाल हा (1,63,53,200 रू) आहे.
जिल्हयातील वाळू माफियांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पोलीस शिपायास तात्काळ निलंबित केले.
पोलीस ठाणे गेवराई येथील पोलीस अंमलदाराचे अवैध धंधेवाल्यांशी संबंध असल्याच्या तक्रारीवरून तात्काळ बदली केली
जिल्हयातील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याकरीता सायंकाळी 16.00 ते 18.00 वा.ची वेळ निश्चीत करण्यात आली असून तक्रारदार यांची तक्रार अनांची प्रत तात्काळ संबंधित प्रभारी अधिकारी यांना व्हॉटसअॅपवर पाठवून त्यांचे तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येते.
जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे येथे प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा केला जातो. दिनांक 21/12/2024 रोजी पासून एकूण (1969) तक्रारी अर्जाची निर्गती करण्यात आली आहे.
जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, शाखा, कार्यालय येथे प्रत्येक शनिवारी सकाळी 08.00 ते 10.00 वाजता स्वच्छता मोहिम राबविली जाते.
दिनांक 21/12/2024 रोजी पासून दिनांक 30/01/2025 रोजी पावेतो प्रतिबंधक कारवाईची माहिती
कलम 126 BNSS
इसमांची संख्या
कलम 127 BNSS
इसमांची संख्या
कलम 128 BNSS
इसमांची संख्या
464
590
9
6
9
कलम 129 BNSS
30
इसमांची संख्या
36
9
जिल्हयात संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी 2 मकोका कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हयात अवैध शस्त्र परवाना धारकांचे 310 परवाने रद्य करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेले आहेत.
पोस्टे चकलांबा हद्यीतील MPDA मधील फरार आरोपीस अटक केले आहे.
दिनांक 21/12/2024 रोजी पासून जिल्हयातील वाहतूक शाखा मार्फत एकूण 7876 केसेस करून त्यामध्ये एकूण 54,81,550/- रूपायाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात कोअर पोलीसोंगवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
पोलीस ठाणे गेवराई येथील अवैध धंद्याशी लागेबांध ठेवून आर्थिक उलाढाल करत असलेले दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
बीड जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी यांना नवीन मोबाईल सीम कार्ड देवून संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत जेणेकरून जनतेस 24 तास अवैध धंदे विषयी पोलीस अधिकारी यांना तक्रारी देता येतील.
जिल्हयात ड्रोन, शरीरावर धारण करण्यात येणारे कॅमेरे पोलीसांना वाटप करण्यात येणार आहेत.
जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थी विद्यार्थीनींना अडचणीच्या अनुषंगाने मदत पत्र/साहस पत्र सुरू केले जाणार आहे.
जिल्हयातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर हद्यपार, MPDA आणि MCOCA अंतर्गत कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.
• जिल्हयातील पोलीस दलातील अंमलदारांना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
• जिल्हयातील जनतेस गावी गेल्यावर काही अडचणी उभल्यास आम्हांस मेसेज करू शकता जेणेकरून रात्रीच्या वेळी बंद घर चेक करून होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसण्यास मदत होईल.
• जिल्हयातील पोलीस कामकाज विषयी नागरिकांचा फीडबैंक जाणून घेणेकरीता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय QR कोड सिस्टम कार्यन्वित करण्यात येणार आहे.
जिल्हयात जातीय सलोखा वाढविण्यासाठी पोस्टे स्तरावर विविध बैठकांचे आयोजन केलेले आहे.
जिल्हयातील प्रत्येक अंमलदारास त्याचे प्रथम नावाने संचोधित करणेबाबत आदेशीत केलेले आहे.
• बीड जिल्हयातील सर्व पोस्टेची सांख्यिकी माहिती संकलनासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. उदा. एक्सेल शीट मध्ये गुन्हे डाटा भरण्यात येत आहे.
जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना त्यांचे चांगले कामासाठी तात्काळ बक्षीस योजना चालू केली आहे.
जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वार्षिक बदल्या कायदेप्रमाणे करण्यात येणार आहेत.
जिल्हयात प्रभावी रात्रगस्त सुरू करण्यात आली असून सर्व आस्थापना वेळेत बंद करण्यात येत आहेत व त्यावर नियंत्रण कक्ष बोड येथून प्रभावी पर्यवेक्षण केले जाते.
• जिल्हयातील सर्व पोस्टेला प्रलंबित मुद्येमाल माहितीसाठी ई मुद्येमाल प्रणाली सुरू करण्यात येत आहे.
• जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे व शाखा यांचे कार्यमुल्यमापनाचा मासिक आढावा घेतला जातो.
जिल्हयात मालमत्तेच्या दाखल गुन्हयांमध्ये उघडकीस आणण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.