सावधान ! तो आलाय शेतामध्ये एकटे जात आसाल तर ?
एकाच दिवसात पाटोद्यात दोघांवर हामला एकाचा मृत्यु एक जखमी

बीड जिल्ह्यातल्या अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे डोंगराळ भागातील शेतकऱ्यां कडुण बोलले जात आहे ! आपणही जर शेतात जात आसाल तर काळजी घ्या अन्यथा तुम्ही पण कोणत्याही क्षणी त्याचे शिकार बनु शकता
वेगवान मराठी बीड केशव मुंडे -६ फेब्रुवारी 2025 पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील शिवारात , बिबट्याच्या हल्ल्यात सोजरबाई धोंडीराम बोबडे (वय ६५वर्षे) या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
दरम्यान याच दिवशी कारेगाव येथील तरुणावर देखील बिबट्याने जिवघेणा हल्ला केला आसुण जख्मी तरुणावर पाटोद्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आसुण दोन्ही ठिकाणी आमदार सुरेश आण्णा धस आणि त्यांच्या मुलाकडुण सदरील कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आहे….
मेंगडेवाडी येथील नागरीक भगवान शिंदे यांनी सांगीतलेला घटनाक्रम-
सोजरबाई धोंडीराम बोबडे हि महिला नित्याप्रमाणे दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात दररोज जात असता त्याप्रमाणेच आज दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे हे शेतातील गुरे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या गोठ्या शेजारी शेतात सोजरबाई यांचे प्रेत त्यांनी पाहीले.
त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले. शेता मध्ये बिबट्याचे ठसे देखील दिसुन आले.त्यांनी सोजरबाई यांचा नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून घटणेची माहिती दिली.
त्यानंतर घटनास्थळी मेंगडेवाडी च्या ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी आर एफ ओ श्रीकांत काळे मो.नं.९०७५४९५७६१ आणि पोलिस निरीक्षक जाधव यांना मो.नं. ७७२२०३५२०९ यांना फोन वरून सदरील घटणेची माहिती दिली.
त्यानंतर सायंकाळी पाटोदा पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके व बीट अंमलदार बाळासाहेब वाघ पाटोदा यांनी घटनास्थळी भेट देऊन घटणास्थळीचा पंचनामा केला.
दरम्यान वनविभागाचे आरएफओ श्रीकांत काळे घटनास्थळी दाखल झाले आसल्याची माहिती आहे . प्रेत शव विच्छेदना साठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने मेंगडेवाडी गावासह बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यां मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे
दरम्यान त्या बिबट्याचा वन विभागाणे तात्काळ बंदोबस्त करुण बिबट्यास बंदिस्त करण्याचे आदेश आष्टीचे आमदार व भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश धस यांनी दिले आसुण घटणेत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आहे 👇
आज बोबडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की, शेतात रात्री अपरात्री किंवा दिवसाही कामानिमित्त जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचं आहे.
शिवाय वन्य प्राण्यांपासून लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशा वनविभागाला देखील सूचना केल्या आहेत.
दरम्यान बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्या आढळुन येत असल्याचे शेतकऱ्यांकडुण सांगीतले जात आसुण शेतकरी वर्गात सध्या बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सुरेश आण्णा धस हे पहिल्या घटणेतील कुटुंबियांना भेटुन परत येई पर्यंतच कारेगाव येथील तरुणावर देखील बिबट्याने हल्ला केल्याची दुसरी घटणा समोर
भोसले वस्ती कारेगाव (पाटोदा तालुका) येथील गोवर्धन येवले या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली. गोवर्धनवर बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माझा मुलगा सागर याने आज गोवर्धन येवले याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, त्याला धीर देण्याचे काम केले.
गोवर्धनला काहीही मदत लागल्यास ती करण्याचे आश्र्वासित करत, रुग्णालयात त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याबाबत रुग्ण प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सागरने सविस्तर चर्चा केली.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.