क्राईमबीड

परळी शहर व ग्रामिण भागातील पोलीस कारवायांची जनतेत चर्चा

Police crackdown in Parli city and rural areas

परळीत कर्णकर्कश आवाज करणा-या वाहना
सह इतर वाहनावर मोठी कारवाई

जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस स्टेशन यांचे संयुक्त पथक सतर्क –परळी मध्ये कारवाई चे सत्र

वेगवान मराठी परळी -केशव डि.मुंडे परळी वैजनाथ प्रतिनिधी 13 फेब्रुवारी 2025  बीड जिल्हयाचे पोलीस अधिक्षक कावत यांच्या आदेशानुसार अप्पर अधिक्षक चेतना तिडके,अतिरिक्त एसपी
सचिन पानडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि.नाचन व पो.नि.सुभाष सानप
जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरातील कर्णकर्कश सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट लावणार्या वाहनांवर धडक कार्यवाही मोहीम सुरू केल्याने वाहनचालकांत खळबळ माजली आहे.

परळी शहरातील धूम स्टाईल वाहने चालवणार्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

वारंवार नागरिकांनी मागणी करूनही पोलीस कुठलीही कारवाई या वाहनचालकांवर करीत नसल्याचा आरोप परळीकर करीत होते.

मात्र अचानक बुधवार दि 12 फेब्रुवारी पासून जिल्हा वाहतूक शाखा व परळी शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई टॉवर, उड्डाण पुलावर वाहतूक पोलिस पथकाने कारवाई सुरू करत कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन परवाना तपासणी चालू केली.

चौकात कधीही न दिसणारे पोलीस अचानक अवतरल्याने वाहन चालक अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पोलिसाने अडवणे व चौकशी करणे याची सवय नसल्याने वाहनचालक व पोलिसांत वादविवाद या कारवाई दरम्यान होत होते.

मात्र पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने अनेक वाहनचालकांनी निमूटपणे दंड देत आपली सुटका करून घेतली.
या विशेष कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास 135 वाहनांवर कारवाई केली.

यात 11 बुलेटचे सायलेन्सर काढणे, दादा,भाऊ,काका,आण्णा अश्या फॅन्सी नंबरप्लेटवर
लावल्याबद्दल वाहनांवर तर वाहन परवाना नसल्याबद्दल वाहनांवर कार्यवाही केली.

या मोहिमेत वाहनचकांवर 82 हजारची दंडात्मक कारवाई करण्यात आल्या असून या कारवाई मुळे परळी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुसाट वाहनचकांना चाप बसण्यासाठी वारंवार अश्या कडक कारवाया करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

या कारवाईत बीड वाहतूक पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ,पोउनि.अमोल शिंगणे,हवालदार नारायण दराडे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत राठोड,नितीन काकडे,कल्याण जावळे,वसीम शेख,नारायण वाघमारे सहभागी होते.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!