10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज भरण्याचे आव्हान
Institutions are challenged to apply online for 10th and 12th grade students according to Grace's qualities

दहावी,बारावी,विध्यार्थ्यांच्या, क्रीडा ग्रेस गुणांबद्दल,ऑनलाईन अर्ज करण्याचे संस्थाना आवाहन
वेगवान मराठी बीड दि. 13 फेब्रुवारी 2025 बुधवार- ( -केशव डि. मुंडे जि मा का ) :- इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज शासनाच्या आपले सरकार प्रणालीद्वारे केवळ ऑनलाईन पध्दतीने भरणे बाबत आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हयातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता 10 वी व 12 वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज मागविले जातात. त्या माहितीचे संकलन करुन कार्यालयाद्वारे सदरचे अर्ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळास ग्रेस गुण मिळणे करीता पाठविले जातात.
सन 2023-24 पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रीया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होती. व त्याचा फटका विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रीया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासुन म्हणजेच 2024-25 पासुन ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे.
तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.
खेळाडू विद्यार्थी / जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार ॲपद्वारे या वर्षीपासुन सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे.
त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडुन स्विकारला जाणार नाही
जर अशी बाब कार्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित संस्था जबाबदार राहतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडुन कोणत्याही प्रकारचा सवलत गुणांबाबतचा ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
सर्व शाळा विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विद्यार्थी यांनी उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी.
त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्या बाबत अवगत करण्यात येत आहे.
अधिकच्या माहिती करीता क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील यांना 9623781121 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, हे कळवितात

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.