
बिबे.बोर, विकून मुलाला केले नोकरदार !
सारूळच्या शेतकऱ्याच्या कष्टाचे झाले चीज ! वडीलांच्या मेहणतीचे आणि गणेश च्या यशाचे होतय सर्वत्र कौतुक
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड 25 फेब्रुवारी 2025 : केज तालुक्यातील सारूळ येथील शेतकऱ्याने शेतात पिकविलेल्या बोराची विक्री करून मुलाचे शिक्षण पदवीपर्यंत केले. तोच मुलगा आज नोकरीला लागला असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे बोर विक्रीतून मुलाला नोकरदार केल्याने परिसरातून या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.
केज तालुक्यातील सारुळ येथील अशोक ढाकणे हे गरीब शेतकरी असून संसाराचा गाडा ओढताना किती मेहनत घ्यावी लागते याचे जिवंत उदाहरण अशोक ढाकणे यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसून येते.
जेमतेम शेती आणि शेतीवरच उदरनिर्वाह अशी परिस्थिती आहे मुलाचे शिक्षण संसाराचा खर्च भागवितांना त्यांना नको ती कष्ट करावी लागली शेतात असलेल्या बोरीच्या झाडाची बोर बाजारात विकून मुलाच्या शिक्षणाला ते हातभार लावत.
मुलानेही प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात व त्यानंतरचे अतिशय जिद्दीने केज येथील यशवंतराव कराड महाविद्यालयात शिक्षण घेतले अनेक परीक्षा दिल्या स्पर्धा परीक्षेची ही तयारी केली मात्र यश मिळत नव्हते,
त्यानंतर आत्ताच नुकत्याच झालेल्या आरोग्य सेवक भरती मध्ये जळगाव महानगरपालिकेमध्ये त्याची आरोग्य सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आहे.
वडिलांनी अतिशय कष्टातून आर्थिक तडजोडी करून मुलाच्या शिक्षणाला हातभार लावला बोर विकली शेती केली संसार आणि शिक्षण या दोन्हीही स्तरावर त्यांनी लक्ष देऊन खर्च केला. मुलाला शिक्षणासाठी स्वातंत्र्य दिले त्यामुळेच शिक्षणात मुलाने प्रगती केली.
त्याचाच प्रत्यय मुलगा गणेश ढाकणे याला आला असून त्याची आरोग्य सहाय्यक पदी निवड झाली आहे.
या निवडीने केज परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण भागात तील विद्यार्थी असूनही चांगले शिक्षण घेतल्यानंतर यश मिळू शकतेच हेच गणेश ढाकणे यांनी सिद्ध करून दाखवले आहे, याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनीही घेतला तर यश जास्त दूर जाणार नाही अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.