बीड

बीड मधील मराठा,वंजारी वादाला माधव जाधवांच्या कृतीने तिलांजली

Madhav Jadhav pays tribute to the Maratha Vanjari caste dispute in Beed district

बीड मधील आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला ॲड माधव जाधव यांनी केली 25 हजार रुपयांची मदत….

जातीपातीच्या भिंती तोडून ॲड माधव जाधव यांनी पीडित नागरगोजे कुटुंबाला दिला आधार….

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 22 मार्च 2025 : देवगाव ता.केज जिल्हा बीड येथील रहिवासी असणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी बीड येथील बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. 18 वर्ष शिक्षकाची नोकरी मोफत केल्यानंतर सुद्धा त्यांना पगार चालू न झाल्यामुळे धनंजय नागरगोजे यांनी तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक वर पोस्ट टाकून स्वतःची जीवन यात्रा संपवली.

मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी व त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ही सहा महिन्याची गरोदर आहे.घरामध्ये वृद्ध आई-वडील आहेत.अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.

त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये व संकटामध्ये आहे.ॲड माधव जाधव यांनी देवगाव ता.केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील भानुदासराव नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत 25000 रुपयाचा धनादेश देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

विषय 25000 हजाराचा नसुण बीड जिल्ह्यात मराठा वंजारी वाद विकोपाला गेलेला आसताना मराठा चळवळीतील सक्रिय असलेल्या मराठा सेवक माधव जाधव आप्पा यांनी वंजारी समाजातील मृत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करुण मानवता हि जाती पेक्षा श्रेष्ठ आसल्याचे दाखवुण तर दिलेच आहे परंतु जातीच्या आडुण स्वतःचे पापं झापण्याऱ्यांच्या थोबाडावर मारलेली हि जबरदस्तं चपराक आहे आसे बोलले जात आहे ..

निवडणुकी पुरता आणि संकट आल्यावर जात आठवणाऱ्या बीड जिल्ह्यातील ढोंगी नेत्यांनी माधव आप्पाच्या कार्याचा आता तरी आदर्श घ्यावा अन्यथा जातीला स्वताची जहागीरदारी समजुन जातीचा वाटेल तसा वापर करणाऱ्यांना एक दिवस जातीचे लोकच चप्पलांनी मारतील ! आणि ठणकाऊण सांगतील आता बस्स करा ! तुम्ही म्हणजे जात नाही !

यावेळी  सर्व जाती धर्मातील प्रतिष्ठित व्यकतींसह ॲड माधव जाधव यांचे सोबत ॲड.रणजीत खोडसे, श्री देविदास नागरगोजे, सुनील घोळवे,शरद मुंडे,अशोक नागरगोजे, सदाशिव मुंडे, ॲड. एस. एल. गलांडे ,ॲड. एस. व्ही. गलांडे ,ॲड. एम. एल. भोसले ,ॲड. पी. डी. इतापे,, ॲड. कोनैण काझी, सुग्रीव आप्पा अंबाड व ग्रामस्थ ऊपस्थीत होते.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!