
दिनांक 22.03.2025 जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा गुंडगिरी करणाऱ्याला दणका !
(परळी भागात गुंडगिरी करणाऱ्या धोकादायक गुंडाची MPDA कायद्याअंतर्गत हर्मुल कारागृहात रवानगी)
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड जिल्हयातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अविनाश पाठक यांची खंबीर साथ लाभली आहे,
बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयाचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे वोजिले आहे.
त्या अनुषधांने पोनि पो.स्टे. परळी ग्रामीण यांनी दिनांक 04.03.2025 रोजी इसम नामे मोहन दौलत मुंडे रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि.बीड याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमाविरुध्द पो. ठा. परळी ग्रामीण येथे दिवसा व रात्री घरफोडी करणे, खंडणी मागणे, मारहाण करणे,कररवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 07 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे.
सदरील इसम हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सबईचा असल्याने परळी व अंबाजोगाई पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणुन यापूवी CrPC 110 प्रमाणे दि.26.11.2022 रोजी त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गंभीर गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता. त्याची अंबाजोगाई व परळी भागात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देवून दहशत निर्माण करुन गुन्हे करत होता,
सदर प्रकरणात श्री. अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी बीड यांनी दिनांक 18.03.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदाक्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते.
त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना पोनि परळी ग्रामीण व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या.
सदर आदेशावरुन पो. नि. स्थागुशा श्री उस्मान शेख यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर इसमास दिनांक 21.03.2025 रोजी बीड शहरात ताब्यात घेऊन पो.स्टे. परळी ग्रामीण येथे हजर केले आहे. पो.स्टे. परळी ग्रामीण येथे सदर इसमास कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 22.03.2025 रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अ पो अ अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, उपविपोअ अंबाजोगाई श्री. अनिल चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री उस्मान शेख स्थागुशा बीड, पोनि मझहर सय्यद, पोउपनि शेख, पवार, पोहः सुनिल अन्नमवार पो.स्टे. परळी ग्रामीण यांचे सह पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकुटे, तुळशिराम जगताप, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोह/युनुस बागवान, राहुल शिंदे, कैलास ठोंबरे, पोअं चंद्रसेन राऊत, विबीषण चव्हाण नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.
भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षक बीड यांचे कडुण संपादक वेगवान मराठी करीता

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.