बीडमहाराष्ट्र

29 मार्च रोजी वाहतुक मार्गा बाबत मोठी अपडेट ! मच्छिंद्रनाथ संजिवन समाधी उत्सव सोहळा

Major police closure orders issued on 29th March 2025 in Beed and Ahilyanagar traffic routes

आदेश मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) अन्वये क्रमांक श.वा.शा/आदेश//२०२५ अहिल्यानगर दिनांक २७/०३/२०२५

वेगवान मराठी नेटवर्क बीड- प्रतिनिधी केशव डी मुंडे दिनांक 27 मार्च 2025 -ज्याअर्थी, अंभोरा पोलीस स्टेशन, जिल्हा बीड येथील मौजे श्री क्षेत्र मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगांव घाट ता. आष्टी येथे सालाबाद प्रमाणे चालु वर्षी दिनांक २९/०३/२०२५ ते दिनांक ३०/०३/२०२५ रोजीचे दरम्यान संजिवनी समाधी उत्सव सोहळा संपन्न होणार आहे.

त्यासाठी राज्यातून व परराज्यातुन मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येणार असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच श्री क्षेत्र मडी ता. पाथडी जि. अहिल्यानगर येथून शेंडगेवाडी मार्गे श्री. क्षेत्र मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगाव घाट ता. आष्टी जिल्हा बीड कडे जाणारा रस्ता हा एक पदरी असुन संपूर्ण घाट मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवुन संजिवनी समाधी उत्सव सोहळ्याकरीता आलेल्या भाविकांच्या वाहनांचा आपघात होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याकरीता श्री.क्षेत्र मढी ता. पाथडी जि. अहिल्यानगर येथून शेंडगेवाडी मार्गे श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव घाट ता. आष्टी जि. बीड कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्या अर्थी मी राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर मला मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन या आदेशात नमुद केलेप्रमाणे

दि. २९/०३/२०२५ रोजीचे सकाळी ०९.०० वाजेपासुन ते दिनांक ३०/०३/२०२५ रोजीचे सकाळी ०९.०० वाजेपावेतो श्री. क्षेत्र मढ़ी ता. पाथडी जि. अहिल्यानगर येथून शेंडगेवाडी मार्गे श्री क्षेत्र मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगाव घाट ता. आष्टी जि. बीड कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविणे बाबतचा आदेश पारीत करीत आहे.

१) श्री.क्षेत्र मढी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर येथून शेंडगेवाडी मार्गे श्री. क्षेत्र मच्छिद्रनाथ देवस्थान सावरगाव घाट ता.आष्टी जि. बीड कडे जाणारी सर्व प्रकारचे वाहनांकरीता वाहतुकीचा मार्ग

> मडी घाटशिरस वृध्देश्वर सावरगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या

वाहनांना लागू राहणार नाही.

प्रस्तुतचा आदेश आज दि. १/०३/२०२५ रोजी माझे सही शिक्यानिशी दिला आहे.

पोलीस अधिक्षक अहिल्यानगर

प्रत सस्नेह प्रेषित:

१) मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर

) जिल्हा माहिती अधिकारी, अहिल्यानगर २

/- सदरच्या आदेशास स्थानिक वर्तमानपत्रात तात्काळ प्रसिध्दी देण्यात यावी.

प्रत: १) अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

२) तहसीलदार, पाथर्डी

३) उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव

प्रती: १) प्रभारी अधिकारी, पाथडी पो.स्टे., अहिल्यानगर

यांनी आवश्यक त्या ठिकाणी बैरीगेटींग व दिशादर्शक फलके लावून आपले नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार नेमून उपरोक्त आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!