क्राईम

परळी मध्ये घडली लज्जास्पद घटणा ! शहर पोलीसां कडुण अतीजलद कारवाई

Parli city police take action against a youth who threatened women with malicious intent

टुक्कार मोक्कार छप्परी चिंधीचोर आणि संस्कार न झालेल्या आशा नालायक वृती च्या गुंडाडांमुळे परळी शहर बदनाम झाले आहे,

नवनीत कॉवत साहेब यांनी बीड च्या पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळल्या पासुन बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीच्या स्वच्छता अभियाणास सुरुवात झाली आहे ! त्याचाच परिणाम म्हणजे अवघ्या 5 तासात परळी शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे

सदरील कार्यवाही चे कौतुकच परंतु परळी शहरात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री आणि हातभट्टीवाल्यांचा सुळसुळाट सुरुच आहे !

अनेक ठिकाणी पहाटेच्या 5 वाजल्यापासुण हातभट्टीची राजरोषपणे विक्री सुरु आहे आणि या आड्यांचे हाफ्ते कोण घेते याची यांच्या पाठीमागे कोणाचा अशिर्वाद आहे याची पण कसुण चौकशी होणे गरजेचे आहे

पोलिस स्टेशन परळी शहर यांच्या कडुण दखल घेऊण तातडीने कारवाई करण्यात आली आहे

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वैजनाथ –आज दिनांक 28 3 2025 रोजी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान कडबा मार्केट वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेतील झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी प्रतविधीसाठी काही महिला ह्या गेलेले असताना त्या ठिकाणी आरोपी हा तेथे लपून बसून, येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना वाईट उद्देशाने इशारे करत असल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येवून त्यावरून गु र न 67/2025 कलम – 74,75(2 ),79 BNS प्रमाणे वेळ – 10.33 वाजता दाखल करण्यात आला होता.

सदर दाखल गुन्हातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याचेकडे व साक्षीदारांकडे तपास करुन आरोपीविरुद्ध पुरावा मिळून आल्याने, मा. वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्राचे पडताळणी करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे, दोषारोप नंबर.33/25 सह मा. कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून, scc no. 151/25 दिनाक 28/3/2025 असा प्राप्त आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि योगेश शिंदे यांनी केला आहे.महिला विषयांच्या प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करण्याचे मा.वरीष्ठचे आदेश आहेत,

सदर तपास हा मा.sp sir श्री नवनीत सर, अप्पर पो. अधीक्षक श्रीमती चेतना मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल सर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर पो निरीक्षक रघुनाथ नाचण, सपोनि श्री योगेश शिंदे ,नितीन, मपोहे सविता, गोविन्द, किशोर. पो. शि.पंडीत, रामकिशन, धनश्री,वर्षा, यांनी वेळेत पुर्ण करुन, अवघ्या 05 तासात दाखल गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केलेले आहे…..

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!