श्रीशैलम येथील अपघातामध्ये एका डिएसपी आणि परभणी येथील गुत्तेदाराचा मृत्यु
DSP from Ahilyanagar and Guttedar from Parbhani died in an accident in Srisailam

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे-दिनांक 29 मार्च 2025 तेलंगणातील श्रीशैलम येथून नागर कुरलूनकडे जात असताना आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे.ते मुळ अहिल्यानगर येथील आसुण सध्या ते मुंबई मध्ये सेवेत कार्यरत होते.त्यांच्या सोबत परभणी येथील एका गुत्तेदाराचा हि या अपघाता मध्ये मृत्यु झाला आहे
देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे.
हे दोघे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला.
सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.
वेगवान मराठी नेटवर्क महाराष्ट्

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.