बीड ब्रेकींग-मस्जिदी मध्ये ब्लास्टींग ! एसपी नवनीत कॉवत यांनी हालवली यंत्रणा
Beed Breaking - Blasting in Masjidi SP Navneet Kaut immediately mobilized the system

अर्धमसला या गावांमध्ये रवीवारी रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान मज्जिद मध्ये विहिरीच्या ब्लास्टींग साठी वापरात येणाऱ्या तोट्याचा मज्जिदीच्या दरवाजे व खिडक्या मध्ये लावून ब्लास्टींग केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे
दरम्यान मज्जितला तडे गेलेले आहेत पहाटे सकाळ पासुण मुस्लिम समाजातील नागरीक मोठ्या संख्येने जमले आसुण सध्या ते या घटणे च्या निषेधार्थ निदर्शने करत असून समाजकंटकां विरोधात घोषणा देत आहेत
दोन आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे
: आरोपी ही अर्धमसला गावातलेच असल्याची शंका व्यक्त केली जात आहे
सदरील घटणेची दखल घेऊण पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी घटणास्थळी पोलीसांचा मोठा फौज फाटा तैनात केला आसुण गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत घटणास्थळी भेट देणार का याबाबत आता पर्यंत आधिकृत माहीती प्राप्त झालेली नाही.
आगोदरच बीड जिल्हा गुन्हेगारी,भ्रष्टाचार,अवैध धंदे आणि खुन प्रकरणातील घटणांमुळे देशभरात चर्चेत आसताना या प्रकरणामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
हा प्रकार दोन धर्मात तेढ निर्माण करुण बीडला बदनाम करण्याचे समाजविघातक कृत्य कोणीतरी जानीवपुर्वक केलेले आसु शकते त्यामुळे वेगवान मराठी बीड जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मातील सुज्ञ नागरीकांना संयम आणि शांतता राखुण कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे
वेगवान मराठी नेटवर्क बीड -केशव डी मुंडे (नमामि वैद्यनाथम् निवास परळी वै 8888 387 622 )

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.