पंकजा मुंडे यांच्या पत्रास परळी पालिके कडुण दाखवला कचऱ्याचा घाट
Parli Municipality shows garbage dump to Environment and Animal Husbandry Minister Pankaja Munde's letter

पशु संवर्धन मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या आदेशाला परळी नगरपरिषद सीईओ यांनी दाखवली केराची टोपली…
वेगवान मराठी परळी प्रतिनिधी 1 एप्रील 2025 तारीख पे तारीख, हप्ता आहे सर्वाच्या गळ्यातील ताईत,कधी होणार परळीचे वातावरण टाईट,परळीकर सुराज्याच्या प्रतिक्षेत चातक पक्षा प्रमाणे बघताहेत वाट, परंतु नगरपालीका प्रशासण एवढे निर्ढावले आहे की ते स्थानीकच्या मंत्र्याच्या पत्राला देखील दाखवताहेत थेट कचरा कुंडीचा घाट…
त्यामुळे परळीतील जनतेच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत की प्रशासन आणि कसाई यांच्यात आर्थिक लागे बांधे आहेत का ?
सर्व काही ठरवुण सुनियोजीत पद्धतीने लावलेला कार्यक्रम तर नाही ना ? परळीला कोणी वाली आहे का ?
कत्तलखाने बंद करण्यात यावेत यासाठी हाफ्ताभर केलेल्या अमरण उपोषणास परळीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता,मग जनतेच्या रेट्यासमोर प्रशासणाने दिलेल्या शब्दाचे काय झाले ?
पर्यावरण व पशु पालन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्राचे मुल्य काहीच नाही का ?
मग नेमकं कोणाचे पत्र लागते कतलखाने बंद करण्यासाठी परळी प्रशासणास असा सवाल परळीकरांसह सकल हिंदू समाजाच्या वतीने विचारला जात आहे
परळी शहरात गोरक्षकांच्या वतीने गोवंश कत्तल बंद करून कत्तल खाना उध्वस्त करण्या संदर्भात 6 दिवस आमरण उपोषण केले होते या उपोषण करणाऱ्या गोरक्षक यांना पाठिंबा म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात आला मोर्च्यात महिला सुधा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या
प्रशासन मंत्र्याचा फोन आल्या नंतर जागे झाले आणि लेखी स्वरूपात सर्व मागण्या मान्य केल्या पण दिलेल्या तारखेची मुद्दत संपून महिना झाला तरी अजून कत्तल खाण्यावर कुठलीच कार्यवाही केली नाही
उलट गोवंश कत्तल करण्यासाठी नगरपरिषद सीईओ यांनी अभय दिले अशी चर्चा परळी शहरातील नागरीकां मध्ये व गोरक्षक यांच्यात आहे
सीईओ यांनी लवकर कार्यवाही करावी अन्यथा गोरक्षक यांच्या वतीने कत्तल खाना उद्धवस्त करण्यात येईल असा इशारा गोरक्षक यांनी दिला आहे..
नोट:–एप्रिल फुल स्पेशल

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.