
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील पोखरी रोड वर आज सकाळी राजकुमार साहेबराव करडे या तरुणावर दोघा जणांनी धारदार हत्याराने सपासप वार करुण रक्ताच्या थारोळ्यात सोडुण फरार झाले होते, कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते.
यातच जखमी राजकुमारचा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा गुन्हा अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरातील राजकुमार करडे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता.
चनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. तो मित्रांना व घरातील सदस्यांना नेहमी सांगायचा कि माझ्या तिच्यावर प्रेम असून आम्ही दोघे लग्न करणार आहोत.
परंतु, जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत होते आणि या प्रेम प्रकरणात देखील अखेर जि जाता जात नाही ती जात आडवी आली व राज कुमार आणि त्याच्या राणी ची कायमची ताटतुट करुणच शांत झाली
म्हणजेच एकुण काय तर “भातुकलीच्या खेळामधली राजा आण एक राणी आर्ध्या वरती डाव मोडला आधुरी एक कहाणी”
दरम्यान माझ्या मुलीचा नाद सोड नाहीतर जिवे मारून टाकू अशा धमक्या वैजनाथ शिंदे सतत देत असल्याचे राजकुमार करडे याने त्याच्या आईला सांगितले होते आशी माहिती समोर आली आहे
दरम्यान सदरील घटणेतील आरोपी वैजनाथ शिंदे, व वेदांत शिंदे,म्हणजेच या घटणेतील मारेकरी मुलीचा बाप वैजनाथ शिंदे व भाऊ वेदांत शिंदे याच्यासह त्यांचा सहकारी आदिनाथ भांडे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी झालेल्या या हल्ल्यात राज कमार करडे गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते.
परंतु अखेर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
दरम्यान या खुनाच्या घटनेचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत…
वेगवान मराठी नेटवर्क बीड

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.