जालण्यातील प्रवाशांच्या क्रुझर गाडी चा बीड मध्ये भिषण अपघात
Cruiser train carrying passengers from Jalna meets with accident in Beed, 14 passengers seriously injured

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दि 4 एप्रिल २०२५ जालना येथून दर्शनासाठी तुळजापूरला जात असलेल्या भाविकांच्या कुझर गाडीला बुधवारी रात्री बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा-चौसाळा रोडवर भीषण अपघात झाला. चालकाचा डोळा लागल्याने क्रुझर गाडी वरील ताबा सुटला आणि गाडीने अनेक पलट्या घेतल्यांने प्रवाशी जख्मी झाले .
या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना येथील भाविक क्रुझर गाडीने बीडमार्गे तुळजापूरकडे दर्शनासाठी जात होते.
मांजरसुंब्याच्या पुढे चौसाळा रोडवर रात्रीच्या वेळी चालकाला अचानक झोप लागल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटला, त्यामळे क्रूझर गाडी पलट्या घेऊण रोड लगत असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली.
यामध्ये गायत्री चेडे (वय १७), लक्ष्मी चिलकरनाड (वय ६५), सविता कुलकर्णी (६०), दिपाली खाडे (४०), सुजाचा चेडे (५५), यमुना खरात (५०), लक्ष्मी खरात (५५), सुंदर पांडे (७५), पद्मिनी देशमुख (५८), मिनाक्षी खन्ना (वय ४२) यांच्यासह इतर असे एकूण १४ जण गंभीर जखमी झाले.
जखमींना बुधवारी रात्री उशिरा जिल्हा रूग्णालयात दाखल झाले.
अपघात विभागातील प्रमुख डॉ. प्रितम लोध यांनी त्यांच्यावर उपचार केले. जखमींवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले आहे.
वेगवान मराठी न्युज नेटवर्क बीड

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.