
राजस्थानीच्या ठेवीदार आणि शाळेच्या पालकांना निव्वळ येड्यात काढायचे धंदे सुरु !
ठेवीदारांच्या मड्यावरचे लोणी खाण्यासाठी दलालांची लागली जिवघेणी स्पर्धा !
वेगवान मराठी परळी प्रतिनिधी केशव डी मुंडे दिनांक 5 एप्रिल २०२५ – प्राणि मरुण पडल्यावर ज्याप्रमाणें त्याचे लच्चके तोडण्यासाठी गिधाडं तुटुण पडतात त्याचप्रमाणे परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेट आणि पतसंस्थे चे दिवाळे निघाल्या नंतर संचालक मंडळ फरार झाल्यानंतर ठेवीदारांची बाजु घेण्यासाठी स्थानीक नेत्यांनी नकार दिल्या नंतर,परळी शहरातील टपुन बसलेल्या दलालांनी आगोदरच मरुण पडलेल्या ठेवीदारांच्या मड्यावरचे लोणी खाण्याचे धंदे राजरोस सुरू केलेले दिसत आहेत…
संचालक फरार,स्थानीक लोकप्रतिनिधी मुग गिळुण गप्प, पोलीस प्रशासनाने घेतलेले झोपीचे सोंग ! ठेवीदारांची कमकुवत बाजु या बरोबरच पोद्दार स्कुलचा प्रिंसिपल बीपी सींग याचे दलाल आणि संचालकांशी संगनमत,यामुळे मुळ हाकदार आसलेले ठेवीदार बाजुला फेकले गेले आहेत तर फसवणुक करुण अवैद्यपणे फरार आरोपींच्या सह्या घेऊण काही दलाल या मालमतेवर मालकी हाक्क सांगत तोऱ्यात मिरवत आहेत…
2024 सालच्या 9 व्या महिण्यां पासुण ते आतापर्यंत 7/12 वर बियाणी आणि बाहेती वगळता पोदार शाळेच्या मालमतेवर कोणाचेही नाव नाही एवढच काय तर भाडेपत्रावर देखील या दोघां व्यतीरीक्त इतरांचे नावे नाहित ! मग ठेवीदारांच्या ठेवींमधुन उभारलेल्या शाळेचा मालक अशोक जैन कसा काय ? आसा व्यवहारीक तसेच संतप्त सवाल ठेवीदारां कडुण केला जातोय !
आणि जर आशोक जैन याची गुंतवणूक आहे आसे समजले तरी मग ठेवीदारांच्या ठेवी काय चिचुके आहेत का ? एकुण 8 एकर क्षेत्रफळापैकी 3 एकर क्षेत्रफळ हे आगोदरच अशोक जैन यांने हस्तगत केले आहे, चंदु बियाणी याच्या सांगण्याप्रमाणे अशोक जैन चा पै ना पै त्या 3 एकर मालमतेवर चुकता झाला आहे , तरी पण हा ठेवीदारां बरोबर अ शोक का करतोय ?
एमपीआयडी प्रस्तावा मध्ये गेलेल्या जमीनीचे व्यवहार हे संचालक आणि ठेवीदारांच्या परस्पर अशोक जैन कसा काय करु शकतो ! आणि त्याहुण भयानक बाब म्हणजे प्रशासण यांच्यावर कारवाई का करत नाही ? चंदु लाल बियाणी किंवा बद्रिनारायण बाहेती यावर गप्प का आहेत ?
एकंदरीत पाहता हि सर्व मिलीभग्त आहे की काय ? आणि फरार आसलेल्या आरोपी संचालकांना बाहेरुण मदत करण्याचे हे षडयंत्र तर नाही ना ? की ठेवीदारांच्या ठेवी मालमतेसह गडप करुण ठेवी बुडावायचे पाप तर यांच्या भांड्यात शिजत नाही ना आसा देखील संशय व्यकत करण्यात येत आहे
ठेवीदारांचे एकच म्हणणे आहे जर कोणी या मालमतेवर मालकी दाखवत आसेल तर त्यांने संबंधित मालमते मध्ये गुंतवलेली रक्कम हि व्यायाजसह ठेवीदारांना द्यावी आणि खुशाल मालकीचा तोरा मिरवावा !
हि पहा सातबारा आणि त्या खाली शाळेचे भाडे पत्र कुठेही अशोक जैन याच्या नावाचा उल्लेख दिसुन येत नाही…
हे पहा भाडेपत्र
भाडेपत्र पोद्दार स्कुल

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.