
वेगवान मराठी बीड- प्रतिनीधी दिनांक 22 एप्रिल २०२५ माजलगाव -दोन दिवसा पुर्वी महादेव गायकवाड यांचा त्यांच्याच ढाब्यावर किरकोळ कारणावरून ग्राहकाशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर महादेव गायकवाड व त्यांचा मुलगा अशुतोष यांना जबर मारहाण केली होती व उपचारा दरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यु झाला होता .
यामध्ये महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे सर्वजन रा.आनंद गाव ता.माजलगांव जि.बीड यांना मंगळवारी पहाटे आळंदी पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडाची ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घालण्यात आली
तसेच महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. पैकी महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला.
या प्रकरणातील मयत महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे व अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता.
दरम्यान बीड पोलिसांनी आज या तिघाही आरोपींना पुण्यातील नगर परिषद चौक आळंदी येथून ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार भागवत शेलार, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, राजू पठाण, बप्पासाहेब घोडके, सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली.
KESHAV D MUNDE -8888 387 622 Wegwan Marathi news network india

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.