क्राईमबीड

राजस्थानी पोदार शाळेच्या पालकांची प्रिंसिपल बीपी सिंग च्या विरोधात पोलीसात धाव

Principal BP Singh of Rajasthani Podar Learning School has been accused of cheating parents

राजस्थानी चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालीत पोदार लर्न स्कुल च्या पालकांची प्रिंसिपल बिपी सिंग याच्या विरोधात पोलीसात धाव !

फरार संचालकांच्या संधीचा फायदा उचलत बिपी सिंग याचा शाळेतील व्यवहारात कोट्यावधीचा घोटाळा !

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी.मुंडे बीड-परळी वैजनाथ दिनांक 23 एप्रिल 2025— संचालकांनी राजस्थानी बुडवली ,ठेवीदार देशोधडीस लावले,बिपी सिंग आणि अशोक जैन या दोघांनी मिळुण पोदार ची वाट लावली,शाळेतील लाईटबीलाची थकबाकी 10 लाख ,पालकांची अनामत 1.5 कोटी,पोदारची रौयल्टी 25 लाख,कर्मचाऱ्यांचे वेतन पण ठप्प ! मग जमा झालेले 6 कोटी गेले कुठे ? का इथे पण आले अर्चना आणि सुरेश कुटे ?

कोण आहे बिपी सींग ? आणि काय आहे त्याची पाश्र्वभूमी -?

all india मध्ये पोदार च्या युनिट मध्ये काम करण्यास अपात्र व सक्त बंदी घातलेला हरी मना  राज्यातील ओवाळूण टाकलेला भ्रष्ट माजी सैनिक ! बोलबच्चन आणि तोंडचोपडे पणाच्या बळावर चंदुलाल बियाणी ला प्रभावित करुण गल्ला लोट पगार घेऊण परळीतील पोदार शाळेचे प्रिंसिपल पद मिळवले.‌..

सगळी कडुण ओवाळुण टाकलेल्या बिपी सिंगला भरभराटीच्या काळात चंदुलाल बियाणी यांनी त्याला शैंदुर लाऊण बजरंग बली बनवले त्यामुळे लोक पण त्याचे दर्शन घेऊण त्याच्या नावाची हाणुमान चालीस जपायला लागले .‌..

परंतु चंदु बियाणी ला अटक झाली की बिपी सिंग च्या आंगाला शिरबडलेला शेंदुर हळुहळू गळायला सुरुवात झाली आणि बीपी सिंग चे असुरी रुप लोकां समोर उघडे पडु लागले ! परंतु गेंड्याची कातडी लाऊण पेसे लुटायला मैदानात उतरलेल्या बिपी सिंगने परळी सारख्या अतीचतुर लोकांना वर्षेभर कसलाच मेळ लागु दिला नाही….

कधी दिपक देशमुख ला टोपी घातली तर कधी बंडु मुंडे ला चुना लावला तर कधी ठेवीदारांना झुलवत ठेवले कधी चंदु बियाणी चा आधार घेतला आणि बाहेतीच्या घरातील सदस्य कधी झाला ते कळले पण नाही ! थोड्या दिवसापुर्वी तर चक्क माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अजय मुंडे यांच्या पर्यंत मजल मारली आणि त्यांच्या नावा आडुण ठेवीदारांसह परळीतील लोकांवर रौब गाजवु लागला,

एका वर्षात प्रिंसिपल बीपी सिंग याने खालील लोकांबरोबर टोकाचे वाद घातले आहेत

1-दिपक देशमुख 2 बंडु मुंडे 3 मंदाकिनी बंडु मुंडे 3 चंदुलाल बियाणी,4 पुजा बियाणी 5 बारीकशेठ बियाणी 6 अनेक कर्मचारी,7 अनेक ठेवीदार,8 अनेक पालक,9 संबंध येण्या अगोदरच बंसल च व्यवस्थापक कैलास घुगे 10 शाळेचा औडीटर,यावरुण समजुन जायचे की बिपी सिंग किती बाराचा आहे ते आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने सोबत वादाचे कारण एकच आहे आर्थिक व्यवहार

आता तर कहरच केला आसुण पालकां कडुण स्वतः च्या जबाबदारी वर स्वतः च्या सहीने घेतलेल्या 3.5 लाखांच्या अनामत रक्कमा परत करायची वेळ आली की तो मी नव्हेच ची भुमीका घेत नटसम्राटाला लाजवेल आसा अभिनय करत पैसे परत करण्यास असमर्थता दाखवली आहे ! 👇

एकत्रीत तक्रार अर्ज

पती, मा पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन परळी वैजनाथ ता परळी वैजनाथ जी बीड

विषय :- शिक्षणाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक कैले बाबद.

महोदय,

वरील विषयी आम्ही खाली स्वाक्षरी करणार तक्रार दाखल करतोत की, आम्ही परळी वैजनाथ व परळी तालुक्यातील रहिवाशी असून आम्ही आमचे पाल्य राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट मार्फत राजस्थानी पोदार लर्न स्कूल गंगाखेड रोड परळी वैजनाथ ता परळी वैजनाथ जी बीड येथे इयत 01 ते 10 या वर्गा साठी सी.बी.एस.इ. अफैलेशन नंबर 1130808 या शिक्षण प्रणाली मध्ये शिक्षण घेणे साठी प्रवेश प्राप्त करणेत आलेला होता व आहे.

राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट मार्फत राजस्थानी पोदार लर्न स्कल गंगाखेड रोड परळी वैजनाथ ता परळी वैजनाथ जी बीड यांचे मार्फत चालवणे सुरु असताना व प्रवेश घेते वेळी त्योचे मार्फत एक योजना शिक्षण घेणे साठी चालवत होते

त्यात रक्कम रु 3,50,000/- अक्षरी तीन लाख पन्नास हजार रु राजस्थानी पोदार लर्न स्कूल मध्ये अनामत म्हणून भरा व शिक्षण पूर्ण झाले नंतर

किंवा शाळेतून टी. सी. घेऊन जाते वेळी अनामत रक्कम अर्ज केल्या ल्यानंतर रक्कम 30 दिवसात परत घेऊन जा अशे सागणेत आलेले होते व आहे

त्यानु‌सार खाली स्वाक्षरी करणार यांनी चारीटेबल ट्रस्ट मार्फत राजस्थानी पोदार लर्न स्कूल मध्ये सण 2023-24 व 2024-25 मध्ये अनामत खाली दिलेल्या यादी प्रमाणे रक्कम भरनेत आलेली आहे.

त्याबाबत खाली स्वाक्षरी करणार यांनी त्यांची पावती सदर अर्जा सोबत दाखल करणेत आलेली आहे.

राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट मार्फत राजस्थानी पोदार लर्न स्कूल सुरु असताना विविध वर्तमान पत्र मधील बातमी मध्ये राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट चे संचालक मंडळ यांनी राजस्थानी मल्टी स्टेट सोसायटी ली या संस्थे मध्ये अफरा तफर केले वरून महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले बाबत फरार झाले आहेत

त्याबाबत राजस्थानी पोदार लर्न स्कूल चे प्राचार्य श्री बी. पी. सिंग यांचेशी खाली स्वाक्षरी करणार यांनी सन डिसेंबर 2024 विविध वेळेस विचारणा केली असता तसे काही झालेले नाही

या सर्व अफवा आहेत राजस्थानी पोदार लर्न स्कूल पूर्ण पणे सुरु राहील व तुमचे पाल्य यांचे शिक्षण पूर्ण करुण रक्कम देणेची पूर्ण जबाबदारी शाळेचे वतीने प्राचार्य म्हणून माँझी आहे.

त्यानंतर सन 2024-25 चे शौक्षणिक वर्ष समाप्त झाले नंतर नियमाप्रमाणे अनामत रक्कम भरणा करणेत आलेले खाली स्वाक्षरी करणारे पालक यांनी राजस्थानी पोदार लर्न स्कूल चे प्रचार्य यांचेशी संपर्क करुण अनामत रक्कम परतीची मागणी केली असता त्यांनी रक्कम आज पर्यत परत करणेत आलेली नाही.

तसेच राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट चे पोदार ब्रान्ड मार्फत फ्रान्च्याशीची व रॉयल्टी रक्कम न भरले मुळे व शिक्षक व कर्मचारी याचे पगार न देने व वाहन भत्ता न देने बाबत

वैजनाथ वार्ता, दिव्य अग्नी व इतर दैनिकात बातमी देनेत आलेली आहे व कोणतेही राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट चे संचालक यांचेशी संपर्क होत नाही.

करिता राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट चे संचालक मंडळ, पोदार लर्न स्कूल चे प्रचार्य श्री बी. पी. सिंग व त्याचे साथीदार यांनी खाली स्वाक्षरी करणार यांचे शिक्षणा साठी अनामत रक्कम संस्थेमध्ये जमा करुण टी सी व अनामत रक्कम परत करत नाहीत

तसेच शिक्षकाचे पगार, चालवलेले वाहनाचा खर्च, रॉयल्टी व सन 2023-24 व 2024-25 चा जमा खर्च दिलेला नाही सदर रक्कम घेऊन ती रक्कम स्वतःचे फायदेसाठी वापर करत आहेत किवा केला आहे

करिता राजस्थानी चारीटेबल ट्रस्ट तसेच पोदार लर्न स्कूल चे प्रचार्य श्री बी. पी. सिंग यांचे तपास कामी सर्व खाते फ्रीज करणेत यावेत जेणे करुण कोणतीही रक्कम ते सदर खाते मधून काढू शकणार नाहीत.

तसेच वरील कृती बाबद संबंधिता विरुद्ध गुन्हे दाखल करणेत यावेत बाबद तक्रार करणेत यावी हि विनंती

तक्रारदार/पालक–

23.04.2025 पो. ठाणे अंमलदार संभाजी नगर, परळी वैजनाथ जि.बीड महाराष्ट्र

KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!