
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दि. 24/04/2025: महालक्ष्मी कला केंद्र येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा मॅनेजरला बेड्या…
केज दिनांक 23/04/2025 रोजी महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्र, उमरी शिवार, ता. केज येथे सदर कला केंद्राचे चालक, मालक व मॅनेजर हे काही महीलांकडून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहीती मिळाली होती.
त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी नियंत्रण कक्षाचे सपोनि मधुसुदन घुगे, अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सपोनि श्रीमती वर्षा व्हगाडे व त्यांचे पथकाला सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेशीत केले.
त्यावरुन सदर पथकाने आज दिनांक 24/04/2025 रोजी मध्यरात्री 3:30 वाजेच्या सुमारास एक डमी ग्राहक व दोन पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता सदर ठिकाणी महालक्ष्मी कला केंद्राचा मॅनेजर हा सदर कला केंद्रात 10 महीलांकडून स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेतांना मिळून आला.
सदर ठिकाणाहून 10 पिडीत महीलांची सुटका करण्यात आली असून सदर कला केंद्राचा मॅनेजर मयूर बाबुराव अंधारे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सपोनि मधुसुदन घुगे यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन केज येथे 1) महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्राचे मालक 1) सत्वशीला बाबासाहेब अंधारे रा. स्वरसंगम कॉलनी, बीड, ह.मु. सावंतवाडी (उमरी) ता. केज जि. बीड, महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्र चालवणारे 2) आदित्य सत्वशीला अंधारे, रा. स्वरसंगम कॉलनी, बीड, ह.मु. सावंतवाडी (उमरी) ता. केज जि. बीड, महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतीक कला केंद्राचे मॅनेजर 3) मयूर बाबुराव अंधारे रा. उदयनगर, धारुर ता.धारुर
यांचेविरुद्ध गुर.नं. 186/2025 कलम 3,4,5,6 स्त्रीया व मुली अनैतीक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956, कलम 143 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीक काँवत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मधुसुदन घुगे नियंत्रण कक्ष, स.पो.नि. वर्षा व्हगाडे अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष, पो.ह/1682 बहीरवाळ नेमणूक पिंपळनेर पो.स्टे., पो.ह./242 शिंदे नेम. अ.मा.व्या. प्र. कक्ष, पोना/234 अविनाश घुंगर्ड, पोशि/1927 शुभम घुले, मपोशि/63 अर्चना वंजारे, मपोशि/1876 भाग्यश्री खांडेकर नेमणूक आर.सी.पी. यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.