क्राईमबीड

परळी हुण बीड भारी परळीत येऊण चोरणीं ने केली होती धाडसी चोरी

A woman thief from Beed who stole 4.5 tola worth of jewelry from a woman in Parli was caught.

स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीसांची धडाकेवाज कामगिरी ! परळी येथील शिवकथे दरम्यान विद्या नगर येथील महिलेचे दागीने चोरणाऱ्या महिला चोरणी एक वर्षा नंतर पकडल्या आहेत…

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी -24 एप्रिल 2025 गुरुवार – परळी येथील शिवकचेच्या गर्दीचा फयदा घेवून गंठण चोरी करणाऱ्या महिला घेतल्या ताब्यात साडेचार तोळे सोन्याचे दागिने केले जप्त

दिनांक 26/11/2024 रोजी फिर्यादी नामे उमाबाई उत्तमराव मिटकर वय 66 वर्ष रा. विदयानगर, परळी यांनी पोलीस स्टेशन, परळी शहर येथे येवुन फिर्याद दिली की, दिनांक 13/11/2024 रोजी हालगे गार्डन परळी येथे शिव कथेचा कार्यक्रम असल्याने दुपारी 02.00 वा.दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसाद वाटप चालु झाले महाप्रसादास खुप गर्दी होती.

सदर गदर्दीचा कोणीतरी अज्ञात महिलेने फायदा घेवुन फिर्यादीच्या गळयात हात घालुन ।) दोन तोळयाचे सोन्याचे गंठण जुने वापरते कि.अं. 90,000/- चोरुन घेतले तसेच कमलाबाई बांगड हिचे गळयातील सोन्याची चैन अज्ञात महिलेने गदींचा फायदा घेवुन चोरुन घेवुन गेले.

वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन परळी शहर गु.र.नं. 176/2024 क. 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपीना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो. नि. स्था.गु.शा., बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपी व गेलामालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,

सदरचा गुन्हा हा 1) शालनवाई लक्ष्मण जाधव वय 58 वर्ष 2) केसरबाई सुखदेव जाधव वय 53 वर्ष दोन्ही रा. गांधीनगर, पेठ बीड ता. जि. बीड यांनी गुन्हा केलेला आहे

व त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाळवंडी नाका, बीड ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयातील गेला मुद्देमाल 1) दोन तोळयाचे सोन्याचे गंठण 2) अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन असे एकुण साडेचार तोळे किंमती 2,65,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर महिला आरोपी नामे 1) शालनवाई लक्ष्मण जाधव वय 58 वर्ष 2) केसरबाई सुखदेव जाधव वय 53 वर्ष दोन्ही रा. गांधीनगर, पेठ बीड ता.जि. बीड यांना पुढील तपासकामी पो. स्टे. परळी शहर यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पो. स्टे. परळी शहर वेथील पोलीस अधिकारी व अमंलदार करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, व मा. पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख

यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप-नि. सुशांत सुतळे, पोह मारुती कांबळे, पोह बाळकृष्ण जायभाये, पोह विकास राठोड, मपोह सुशिला हजारे, मपोह स्वाती मुंडे, पोकों नारायण कोरडे, पोकों सचिन आंधळे, चापोह नितीन वडमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!