
बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जान्सन यांनी आज पदभार स्विकारला.
वेगवान मराठी प्रतिनिधी- केशव डी मुंडे बीड 24 एप्रिल 2025 बीड-श्री विवेक जॉन्सन 2018 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आसुण ते केरळ राज्यातील आहेत,बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा 10 महिण्याचा कार्यकाळ हा निष्क्रिय,संशयास्पद व वादग्रस्त ठरल्यामुळे विवेक जॉन्सन यांची नियुक्ती बीडच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली आहे…
बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था,बोकाळलेला जातीवाद,शिखरास पोहचलेला भ्रष्टाचार,निरढावलेली सरकारी यंत्रणा,याच बरोबर जिल्ह्यातील थर्डक्लास राजकारण व पोहचलेले लोकप्रतिनिधी यांचा बंदोबस्त करुण बीड जिल्ह्यातल्या रखडलेल्या विकास कामांना व सामान्य जनतेच्या वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांचा मेळ घालणे म्हणजे विवेक जॉन्सन यांच्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी पद हे काटेरी मुकुटा सारखेच दिसत आहे. ..
दरम्यान या विषयां कडे ते समस्या म्हणुन पाहतात कि एक संधी म्हणुन स्विकारतात हे येणारा काळ ठरवेल तो पर्यंत तुर्तास विवेक जॉन्सन यांना पुढील कार्यास वेगवान मराठी व वेगवान न्युज नेटवर्क समुहाच्या वतिने हार्दिक शुभेच्छा WELCOME-TO BEED VIVEK JONSON SIR 👇
बीड येथे बदलून येण्यापूर्वी ते चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
अभियंता पदवी नंतर ते प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी परिविक्षाधिन कालावधीत बीड येथील माजलगाव नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केलेले आहे.
त्यांनी पदभार स्विकारल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी त्यांचे प्रशासनातर्फे स्वागत केले.
यावेळी महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी तसेच इतरांची उपस्थिती होती.
✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.