
एक महिन्यापूर्वी झाले होते लग्न; नव विवाहित गेले होते परळीतील वैजनाथा च्या दर्शनाला ! दर्शन होताच बायकोनं ठोकली धुम ! नवरीला शोधता शोधता नवरोबाची उडाली त्रेधातिरपीट
परळी वै.प्रतिनिधी केशव डी मुंडे दि -8 मे 2025
नवरा बायको मिळून जोडीने वैद्यनाथ मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर एक खळबळजनक घटना घडली गाभाऱ्यातून दर्शन घेऊन येईपर्यंत पत्नीच गायब झाल्याची घटना दि.5 मे सोमवार रोजी घडली आहे.
याप्रकरणी आता पतीने पोलिसात धाव घेत पत्नी गायब असल्याची खबर दाखल केली असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील वडार कॉलनी भागातील रहिवासी २७ वर्षीय फिर्यादी हा ड्रायव्हर आहे.
त्याचे एक महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे. आपल्या नवपरिनीत पत्नीला घेऊन दि. ५ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजण्याचे सुमारास ते दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरात गेले होते.
मंदीरामध्ये महीला व पुरुष यांची वेगळी दर्शन रांग आहे. पती पुरुष रांगेत तर पत्नी महिलांच्या रांगेतून दर्शनाला गेले.
® परळी शहर पोलिसांत गुन्हा नोंद ©
गाभाऱ्यात पोहचण्यात मागे पुढे झाले. दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर बघितले असता पत्नी दिसली नाही. दर्शन घेऊन बाहेर थांबली असेल म्हणून मंदिर परिसरात शोध घेतला परंतु पत्नी कुठेच आढळत नसल्याचे दिसून आले.
© ती कोणाला काही न सांगता निधुन गेली हे लक्षात आले •
घरी, गल्लीमध्ये, नातेवाईकांकडे सगळीकडे शोध घेतल्यावरही तिचा पत्ता लागत नसल्याने पतीने अखेर पोलीसांकडे बेपत्ता झाल्याची खबर नोंदवली आहे. याबाबत परळी शहर पोलिस तपास करीत आहेत.
✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.