बीड

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश

District Collector Vivek Johnson's instructions regarding pre-monsoon preparations

© बीड जिल्ह्यातील सर्व विभागांनी 31 मे पूर्वी पावसाळा पूर्व तयारी पूर्ण करावी- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश…

® बीड जिल्ह्याच्या इतिहासात इतके सुक्षम नियोजन करण्याची पहिली वेळ ! चांगला आधिकारी असला तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विवेक जॉन्सन…

(वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे) दिनांक 9 मे 2025 -सर्व विभागांनी त्यांच्या कक्षेत असलेल्या पावसाळापूर्व कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत तसेच येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांसाठी शासन यंत्रणेची सज्जता ठेवून पावसामुळे हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी बसे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज दिले.

येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी करावयाच्या कामांचा आडावा जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने, अप्पर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पूर्व तयारी बाबत माहिती दिली.

© जनजागृती करा ®

पावसाळा सुरू होताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना होतात. गावपातळीवर पडणाऱ्या विजेपासून बचाव करण्याच्या उपायांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकायांनी दिल्या.

शासण पातळीवर ग्रामसभामधून याबाबत माहिती देणे तसेच गावा-गावात जनजागृती पर संदेश लावणे, भिंतीपत्रके या माध्यमातून लोकांना माहिती देता येईल असे ते म्हणाले.

जिल्ह्यात 306 गावे नदी काठावर वसलेली आहेत तथापि गेवराई तालुक्यातील 32, माजलगाव तालुक्यातील 26

परळी वैद्यनाथ तालुक्यातील 5 गावांना नदीच्या पुराचा धोका आहे. बीड शहरात देखील सन 2006 आणि सन 2016 मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.

या सर्व गावात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देण्यात आलेले बचाव साहित्य सुस्थितीत असल्याबाबत खात्री करून घ्यावी तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याचे पूर्ण नियोजन करावे असे श्री जॉन्सन म्हणाले.

पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये पुरेसा अन्नसाठा असणे आवश्यक आहे तसेच पावसामुळे रोगराई पसरू शकतील अशा आजारांवरील औषधे देखील ग्रामीण रुग्णालय स्तरावर असतील याची खात्री करावी,

पावसाळ्यात साप चावण्याचे प्रकार घडू शकतात त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात त्या संदर्भातील लस उपलब्ध करून ठेवा असे जिल्हाधिकारी म्हणाले.

काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नुकसान होते अशा ठिकाणी आदेशाची वाट न बघता तालुक्यातील कृषी अधिकारी व तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करावे असेही निर्देश जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी दिले.

पावसात वीज पुरवठा सुरळीत राहील तसेच रस्त्यावरील वाहतूक उत्तम पद्धतीने सुरू राहील याची खबरदारी घेण्याचे आदेश विवेक जॉन्सन दिले आहेत .

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!